13 December 2024 2:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

ICICI Bank Credit Card | तुमच्याकडे ICICI क्रेडिट कार्ड आहे?, घराचं रेंट कसे भरता?, मग ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे

ICICI Bank Credit card

ICICI Bank Credit Card| 20 ऑक्टोबरपासून ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंट केल्यास 1 टक्के शुल्क आकारले जाईल, असा नवीन नियम ICICI बँक ने जाहीर केला आहे. क्रेडिट कार्ड ने रेंट पेमेंट करण्यावर 1 टक्के चार्ज करणारी ICICI बँक ही भारतातील पहिली बँक आहे. तुमच्याकडे जर ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असल्यास, तुम्हाला बँकेकडून एक सूचना आली असेल की, 20 ऑक्टोबरपासून जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर रेंट पेमेंट साठी केल्यास रेंटच्या एकूण रकमेवर 1 टक्के चार्ज आकारले जाईल. ही सूचना अशा सर्व क्रेडिट कार्ड धारकांसाठी आहे जे लोक CRED, RedGiraffe, Paytm किंवा MagicBrick सारख्या अॅप्सद्वारे आपल्या घर मालकाना भाडे देतात.

क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंटवर चार्ज लावणारी ICICI Bank ही भारतातील पहिली बँक ठरली आहे. आतापर्यंत कोणत्याही बँकने किंवा क्रेडिट कार्ड कंपनीने रेंट भरण्यावर कोणतेही चार्ज लावले नव्हते. मात्र, आयसीआयसीआय बँक ने हा नियम जाहीर केल्यानंतर अन्य वित्तीय संस्थाही असे चार्ज आकारू शकतात, अशी भीती क्रेडिट कार्ड धारकांमध्ये निर्माण झाली आहे.

नवीन नियम आणि बदल :
समजा तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे रेंट भरत असाल, तर ते पेमेंट प्लॅटफॉर्म तुम्हाला प्रत्येक व्यवहाराच्या 0.46 टक्के 2.36 टक्के सेवा शुल्क चार्ज करते. हे सेवा शुल्क मर्चंट डिस्काउंट रेट ला पर्याय म्हणून काम करते. व्यवहार पूर्ण करणारा प्लॅटफॉर्म व्यापाऱ्याकडून MDR घेतो, आणि हे त्यांच्या उत्पन्नाचे साधन असते. परंतु भाडे भरण्याच्या बाबतीत, घरमालक हा कंपनीच्या दृष्टीने व्यापारी असतो जो रेंट पेमेंट व्यवहारावर कोणतेही चार्ज भरत नाही. त्यामुळे ऑनलाईन रेंट प्लॅटफॉर्म हे चार्जचे पैसे भाडेकरू कडून वसूल करतात. ICICI द्वारे आकारले जाणारे चार्ज शुल्क ऑनलाईन रेंट प्लॅटफॉर्मद्वारे आधीच आकारले जातात, आता ICICI ही आपल्या क्रेडिट कार्ड द्वारे रेंट पेमेंट केल्यास चार्ज आकारणार आहे.

नियम बदलण्याचे कारण :
आतापर्यंत ICICI बँकेने या नवीन चार्ज ला कोणतेही नाव दिलेले नाही, त्यामुळे हे शुल्क का आकारले जात आहे, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती बँकेकडून देण्यात आलेली नाही. कदाचित क्रेडिट रोटेशन राखण्यासाठी रेंट पेमेंट करून जो क्रेडिट कार्ड सुविधेचा गैरवापर होत आहे, ते टाळण्यासाठी हे नवीन नियम आणले असतील,असे तज्ज्ञांचे असे मत आहे. ग्राहक त्यांच्या कुटुंबीयांना किंवा मित्रांना जमीनदार किंवा घर मालक म्हणून दाखवतात आणि रेंट पेमेंटच्या नावाने पैसे पाठवत असतात. यानंतर त्यांच्या खात्यातील पैसे कॅशमध्ये रूपांतरित केले जातात. आणि त्यावर कोणतेही चार्ज आकारण्याची तरतूद नाही. जर तुम्ही एटीएममधून पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल तर बँकेकडून 2.5 ते 3 टक्के चार्ज आकारला जातो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| ICICI Bank Credit card has announced charge on rent payment by credit card through online platform on 21 September 2022.

हॅशटॅग्स

#ICICI Bank Credit Card(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x