22 November 2024 8:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Multibagger IPO | या गुंतवणूकदारांनी योग्य IPO निवडला, काही दिवसातच मल्टिबॅगर परताव्याचे ग्रे मार्केटमधून संकेत, तुम्ही निवडला आहे का?

Multibagger IPO

Multibagger IPO| शेअर बाजार निरीक्षकांच्या मते, हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनलचा स्टॉक ग्रे मार्केट मध्ये 234 रुपयांच्या प्रीमियमवर किमतीवर ट्रेड करत आहे. हर्षा इंजिनीअरिंग कंपनीच्या आयपीओची इश्यू किंमत 314 ते 330 रुपयांच्या दरम्यान निश्चित करण्यात आली होती. हर्षा इंजिनिअरिंग इंटरनॅशनलच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. ह्या IPO मध्ये अर्ज करणाऱ्या लोकांच्या नजरा आता फक्त स्टॉकच्या लिस्टिंगवर लागले आहेत. हर्षा इंजिनिअरिंगच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना ग्रे मार्केटमधील किमतीने थक्क केले आहे. हर्षा इंजिनियरिंगचा IPO ऑफर क्षमतेच्या 74.70 टक्के अधिक ओव्हरसबस्क्राइब झाला आहे. कंपनीचा शेअर लवकरच NSE आणि BSE निर्देशांकावर सूचीबद्ध होईल.

ग्रे मार्केटमध्ये स्टॉकचे प्रदर्शन :
शेअर बाजार निरीक्षकांच्या मते, हर्षा इंजिनिअरिंगचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 234 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर ट्रेड अरत होता. कंपनीच्या आयपीओची इश्यू प्राईस 314 ते 330 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती. म्हणजेच यानुसार या IPO ची जबरदस्त लिस्टिंग होऊ शकते, असा अंदाज शेअर बाजारातील तज्ञांनी व्यक्त केला आहे. 26 सप्टेंबर 2022 रोजी हर्षा इंजिनीअरिंग कंपनी NSE आणि BSE वर सूचीबद्ध केली जाऊ शकते. 21 सप्टेंबरला कंपनी शेअर्सचे वितरण करेल.

14 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2022 च्या दरम्यान हर्ष इंजिनिअरिंग चा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. कंपनी या IPO द्वारे 755 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करेल. त्यापैकी 300 कोटी रुपये ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून उभारले जाती. कंपनीने IPO मध्ये एका लॉट मध्ये 45 शेअर्स देण्याचे ठरवले आहे.

अहमदाबाद स्थित हर्शा इंजिनिअरिंग कंपनीचा महसूल 51.24 टक्क्यांनी वाढला असून आर्थिक वर्ष 2022 साठी 1321.48 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीचा महसूल 873.75 कोटी रुपये होता. अभियांत्रिकी व्यवसायातील उद्योगातून मिळालेल्या महसुलात प्रचंड वाढ झाल्यामुळे कर कपातीनंतरचा नफा 102.35 टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीने 91.94 कोटी रुपये नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger IPO of Harsha engineering share Price Grey Market Price in focus 21 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x