21 November 2024 3:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News
x

LIC Mutual Fund | एलआयसी शेअर्स नव्हे, LIC म्युच्युअल फंडाची ही योजना श्रीमंत बनवतेय, 1 लाखावर 15 लाखांचा सुपर रिटर्न, नोट करा

LIC Mutual Fund

LIC Mutual Fund | LIC ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC च्या IPO साठी सर्व गुंतवणूकदार फार उत्सुक होते, आणि IPO आला त्यावेळी मात्र लोकाची निराशा झाली. LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे नुकसान झाले. असे असले तरी, LIC ने इक्विटी योजनेमध्ये पैसे गुंतवणाऱ्या आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. LIC च्या अनेक गुंतवणूक योजना आहेत. LIC तर्फे कर सवलती देणाऱ्या काही जबरदस्त योजनाही राबवल्या जातात, त्याच गटातील योजनांपैकी एक सर्वात चांगली गुंतवणूक योजना म्हणजे “LIC म्युच्युअल फंड टॅक्स सेविंग स्कीम”. ही एक इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम म्हणजेच ELSS शगटातील गुंतवणूक योजना आहे.

भरघोस परतावा मिळाला – LIC म्युच्युअल फंड टॅक्स सेविंग स्कीम :
या योजनेतील गुंतवणुकीवर लोकांना आयकर कायदा कलम 80 C अंतर्गत कर सवलतीचा लाभ दिला जातो. या योजनेत गुंतवणूक केल्याने दीर्घकालीन गुंतवणूकदार चांगला परतावा कमवू शकतात. 20 वर्षात या योजनेत एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 15 पटीने अधिक परतावा मिळाला आहे. त्याचबरोबर ज्यांनी SIP च्या माध्यमातून LIC च्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांनाही भरघोस परतावा मिळाला आहे.

योजनेतील परतावा आकडेवारी :
* 20 वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा : 14.5 टक्के CAGR
* 1 लाख गुंतवणूक मूल्य 20 वर्षांमध्ये : 15.53 लाख रुपये परतावा
* गुंतवणुकीवर लाभ : 14.43 लाख रुपये
* 5000 मासिक SIP चे गुंतवणूक मूल्य : 60 लाख रुपये
* SIP मध्ये एकूण गुंतवणूक: 130000 रुपये

म्युचुअल फंड गुंतवणुकीसाठी टॉप 5 गुंतवणूक क्षेत्र
* फायनान्स
* टेक्नॉलॉजी
* सर्विसेस
* केमिकल्स
* ऑटोमोबाईल्स

LIC म्युचुअल फंडाची या स्टॉकमध्ये सर्वाधिक गुंतवणूक आहे :
आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, एव्हेन्यू सुपरमार्ट, टीसीएस, टायटन, एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा ग्राहक उत्पादने, एचयूएल, हे LIC चे पसंतीचे स्टॉक आहेत. LIC ने आपल्या म्युचुअल फंड च्या माध्यमातून या स्टॉकमध्ये भरपूर गुंतवणूक केली आहे.

मालमत्ता आणि खर्चाचे प्रमाण :
* म्युचुअल फंड एकूण मालमत्ता : ऑगस्ट 31, 2022 रोजी 425 कोटी रुपये
* खर्चाचे प्रमाण : जुलै 31, 2022 रोजी 2.55 टक्के
* किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा : 500 रुपये
* किमान SIP गुंतवणूक मर्यादा : 1,000 रुपये
* योजनेची लाँच तारीख : 31 मार्च 1970
* 1970 बेंचमार्क : 31 मार्च 1970
* बेंचमार्क : NIFTY 500

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| LIC Tax Saving Mutual fund scheme investment benefits and Return in invest on 22 September 2022

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x