Penny Stocks | 3 रुपयाच्या शेअरमध्ये 27 हजाराची गुंतवणूक करून निवांत राहिले, आता 1 कोटी रुपये मिळेल, बघा स्टॉक कोणता
Penny Stocks| दोन दिवस शेअर बाजारात थोडीफार हिरवळ पाहायला मिळाली होती, पण नंतर व सेन्सेक्स आणि निफ्टी बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह बंद झाले. यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराबाबत निर्णयामुळे शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली होती. सेन्सेक्समध्ये 0.44 टक्के म्हणजे 262.96 अंकांची घसरण झाली, आणि सेन्सेक्स 59,456.78 अंकावर ट्रेड करत होता. निफ्टीमध्ये 0.55 टक्केची म्हणजेच 98 अंकांची घसरण झाली होती, आणि निफ्टी 17,718.30 अंकावर लाल निशाणीत बंद झाला.
कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये 1251 कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली, तर 2115 कंपनीचे शेअर्स घसरले होते. 117 कंपनीचे शेअर्स अस्थिर दिसून आले. निफ्टीमध्ये श्री सिमेंट्स, अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड कॉर्प आणि अल्ट्राटेक सिमेंट या स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. तर ब्रिटानिया इंडस्ट्रीज, आयटीसी, एचयूएल, अपोलो हॉस्पिटल्स आणि कोल इंडिया या स्टॉक मध्ये थोडीफार वाढ दिसून आली. एफएमसीजी निर्देशांकांत 1 टक्क्यांची वाढ झाली, तर भांडवली वस्तू, तेल आणि वायू, रियल्टी आणि वीज निर्देशांकात 1 ते 2 टक्क्यांची पडझड झाली होती. आज या लेखात आपण अश्या एका स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना अगदी लहान गुंतवणुकीवर करोडोचा परतावा कमावून दिला आहे.
कजारिया सिरॅमिक्स स्टॉक :
आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, तो आहे कजारिया सिरॅमिक्स कंपनीचा. कजारिया सिरॅमिक्सचा स्टॉक 23 वर्षांपासून शेअर बाजारात ट्रेड करत आहे, आणि त्याने आपल्या गुंतवणूकदारांना कधीही निराश केले नाही.1 जानेवारी 1999 रोजी NSE निर्देशांकावर कजारिया सिरॅमिक्सचा शेअर 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या शेअर 1235 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंत ह्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 36,223.53 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीवर 372 पट अधिक नफा कमावला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची 27 हजार रुपयेची छोटीशी गुंतवणूक आता वाढून 1 कोटी रुपये पेक्षा अधिक वाढली आहे.
10 वर्षाचा परतावा :
14 सप्टेंबर 2012 रोजी हा शेअर 88.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर सध्या या स्टॉकची किंमत 1235 रुपये आहे. या कालावधीत स्टॉकमधे 1297.37 टक्के वाढ झाली आहे. मागील 10 वर्षांत ह्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 14 पटीने अधिक वाढले आहेत. मागील दहा वर्षात गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीचे 13.97 लाख झाले आहे. मागील 5 वर्षांत ह्या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 70.75 टक्के परतावा मिळवून दिला आहे. एका वर्षात ह्या स्टॉकने 4.75 टक्के, 6 महिन्यांत 18.33 टक्के परतावा, आणि 1 महिन्यात सुमारे 4.81 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 5 दिवसात ह्या स्टॉकमध्ये 3.87 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
कंपनी व्यवसाय :
“कजारिया सिरॅमिक्स” ही भारतातील सिरेमिक-विट्रिफाइड टाइल्सचे उत्पादन करणारी सर्वात मोठी आणि जगातील नवव्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. त्याची वार्षिक उत्पादन क्षमता 70.40 दशलक्ष चौरस मीटर असून, सिकंदराबाद (उत्तर प्रदेश), गेलपूर (राजस्थान), मलुटाना (राजस्थान), मोरबी (गुजरात),आंध्र प्रदेशातील विजयवाडा मध्ये. अशा एकूण आठ ठिकाणी उत्पादन केंद्र आहेत.
कंपनीबद्दल सविस्तर :
20 डिसेंबर 1985 रोजी कजारिया सिरॅमिक्स लिमिटेड कंपनीची स्थापना झाली होती. सिकंदराबाद, उत्तर प्रदेश येथे कारखाना सुरू करण्यासाठी कंपनीने सप्टेंबर 1988 मध्ये IPO जाहीर केला होता. या उत्पादन युनिटमध्ये व्यावसायिक उत्पादनची सुरुवात ऑगस्ट 1988 पासून सुरू झाली होती. KCL ने काही वर्षांतच आपली उत्पादन क्षमता टप्प्याटप्प्याने वाढवायला सुरू केली. 1988 मध्ये कंपनीची उत्पादन क्षमता 12000 TPA होती. 1999 पर्यंत कंपनीने आपली उत्पादन क्षमता 160000 TPA पर्यंत वाढवली. आणि काजारिया सिरॅमिक ही भारतातील सर्वात मोठी बनली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stock Kajaria ceramics share price return on investment on 22 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, होईल 45% कमाई, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: HAL
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Salary Management | तरुणपणीच्या 'या' 5 आर्थिक चुकांमुळे भविष्य अंधारात जाईल, श्रीमंतीचा मार्ग थांबून खडतर प्रवास सुरू होईल
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे