19 April 2025 9:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Viral Video | उद्धव ठाकरे खोटं बोलतात?, होय!, फक्त नारायण राणे '100 टक्के खरं' बोलतात, व्हिडिओ पहा.. तुमचाही विश्वास बसेल

Narayan Rane

Union Minister Narayan Rane ​​| उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांसमोर केलेल्या भाषणात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर हल्ला केला. नरेंद्र मोदींवरही टीका केली. या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला. भाजप नेते, शिंदे गटातील सहकाऱ्यांकडे वाकड्या नजरेनं बघितलं, तर डोळे जागेवर ठेवणार नाही, असं नारायण राणे म्हणाले.

भाजप आणि शिंदे गटाला धमक्यांची भाषा वापरु नये असेही अवाहन नारायण राणे यांनी दिले. तर भाजप आणि मित्र पक्ष असलेल्या शिंदे गटातील एकाही पदाधिकाऱ्यांच्या केसालाही धक्का लावला तरी मुंबईत फिरु दिले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच दिला आहे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं. राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे म्हणतात, मुंबा आईवर वार करायला येईल, त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. कोण काढणार कोथळा? तू काढणार का? चाकू, सुरी हातात घेणार की आणखी काय घेणार? कुणाचा काढणारेस कोथळा?”, असा टोला नारायण राणेंनी पत्रकार परिषदेतून लगावला.

आता गटनेत्यांपर्यंत आलात. आता याच्याखाली शिवसैनिकच आहेत. आज एव्हढे येताहेत. पुढच्या वर्षी किती येताहेत ते बघा आणि महापालिकेत ते कुठे असतील ते पहा. त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरे भाजपच्या कोणत्याही नेत्याला, कोणत्याही लोकप्रतिनिधीला काही बोलले, तर जशास तसं उत्तर नाही, तर त्याचं तोंड आम्ही बंद करू एव्हढंच आज सांगतो”, असा गर्भित इशारा नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिलाय.

केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी काल गोरेगाव येथील नेस्को संकुलात गटनेत्यांचा मेळावा घेतला. उद्धव ठाकरे गटनेत्यांपर्यंत येऊन पोहोचले. आधी मंत्र्यांची बैठक घ्यायचे. नंतर खासदार आमदारांची बैठक घ्यायचे. गटनेत्यांच्या बैठकीत केंद्र सरकारकडे वळले. गटनेता विभागाचा असतो, त्यांच्यासमोर केंद्र सरकार आणि अमित शाह यांच्याबद्दल बोललेत. ते निराशेतून केलेलं हे भाषणं. मुख्यमंत्री पद गेलं म्हणून हे भाषण आहे”, अशी टीका राणेंनी ठाकरेंवर केली.

मात्र उद्धव ठाकरेंना खोटारडे म्हणून संबोधणाऱ्या नारायण राणेंचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय. काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांनी १ ऑक्टोबर २०१७ रोजी स्वतःचा ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन केला होता. मात्र राज्यभर दौरा करूनही त्यांना जनतेकडून कोणताही प्रतिसाद मिळला नाही. त्यात पक्ष चिन्हं मतदारांना परिचित नसल्याने खासदारकी आणि आमदारकी लढविणाऱ्या आपल्या मुलांच्या राजकीय भवितव्याच्या काळजीने त्यांनी आयत्यावेळी भाजपमध्ये पक्ष विलीन केला होता. नारायणे राणे हे कोकणातील नेते असले तरी सध्या नारायण राणेंचं राजकीय अस्तित्व हे केवळ कणकवली पुरता मर्यादित राहिलं आहे. मात्र ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ अध्यक्ष असताना ते भाजप विरोधक होते. त्यावेळी त्यांनी अमित शहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचावर एक गंभीर विधान केलं होतं. ते विधान सध्याच्या राज्यातील घटनांशी संबंधित आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Union Minister Narayan Rane video trending social media check details 22 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या