22 April 2025 7:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Dividend Stocks | तुमच्या पोर्टफोलिओत या 10 स्टॉक्सचा समावेश करा?, कारण हे हमखास मोठा लाभांश देऊनच पैसा वसूल करून देतात

Dividend stocks

Dividend Stocks | शेअर बाजारामध्ये पुन्हा एकदा अस्थिरता आणि विक्रीचा दबाव वाढत आहे. गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध, पुतीन यांची अणूहल्ल्याची धमकी, आणि चीनचा तैवान विरुद्ध युद्धअभ्यास, ह्या सर्व घडामोडींनी जागतिक बाजारात चिंता पसरली आहे. यूएस फेडरल बँकने ही व्याज दर वाढवण्याची घोषणा केली आहे. ह्याचा नकारात्मक परिणाम आपण शेअर बाजारावर पाहू शकतो.

भारतीय बाजारपेठही याला अपवाद नाही. त्यामुळे चालू वर्षाच्या सुरुवातीपासूनच बऱ्याच कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. या घसरणीमुळे सर्व गुंतवणूकदार आणि भागधारक वैतागले आहेत. अश्या संकटाच्या काळात काही स्टॉक आहेत जे आपल्या भागधारकांना कडक कमाई करून देत आहेत. त्यातील बहुतांश कंपन्यांनी तर लाभांशाही जाहीर केले होते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही गुंतवणूकदार असाल आणि दीर्घकाळासाठी स्टॉकमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला ये लेखात टॉप 10 शेअर्सची माहिती देणार आहोत, ज्यात तुम्ही हमखास पैसे लावू शकता. स्टॉक वाढण्याची अपेक्षा न करता दर तिमाहीत हमखास लाभांश कमवू शकता.

टॉप दहा मल्टी बॅगर स्टॉकची यादी खालीलप्रमाणे : 

वेदांता लिमिटेड :
मोतीलाल ओसवाल यांनी जाहीर केलेल्या डेटानुसार असे दिसते की, वेदांताने आपल्या मागील तीन वर्षात आपल्या भागधारकांना वाढीव लाभांश दिला आहे. वेदांता कंपनीने आर्थिक वर्ष 2015 मध्ये 3.9 रुपये प्रति शेअर लाभांश वितरीत केला होता. त्यावेळी शेअरची किंमत फक्त 9.5 प्रति शेअर होती. आर्थिक वर्ष 2022 मध्ये शेअरची किंमत प्रती 45 रुपये प्रति शेअर वर गेली आहे.

NMDC:
सरकारी मालकीच्या या खनिज उत्पादक कंपनीने 2022 पर्यंत 12.1 टक्के लाभांश दिले आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष 2022 मध्ये आपल्या समभागधारकांना प्रति शेअर 14.7 रुपयेचा लाभांश वितरीत केला होता. आर्थिक वर्ष 2021 मध्ये 7.8 रुपये प्रति शेअर आणि 2010 मध्ये 5.3 रुपये प्रति शेअर लाभांश देण्यात आला होता.

इंडियन ऑइल कॉर्प :
आर्थिक वर्ष 2012 च्या शेवटी तेल विपणन कंपनी इंडियन ऑईल ने 11.8 टक्के लाभांश वितरीत केला होता. आर्थिक वर्ष 2021 मध्ये 8 रुपये प्रति शेअर आणि 2020 मध्ये 2.8 रुपये प्रति शेअरच्या तुलनेत 2022 मध्ये 8.4 रुपये प्रति शेअर वाढीव लाभांश दिला होता.

INEOS Styrolution:
आर्थिक वर्ष 2022 मध्ये या विशेष रासायनिक कंपनीने आपल्या भागधारकांना 11.4 टक्के दराने लाभांश वितरीत केला होता. ही एक स्मॉल-कॅप कंपनी आहे. या स्टॉकने आर्थिक वर्ष 2022 मध्ये प्रति शेअर 105 रुपयेचा लाभांश वितरीत केला, जो आर्थिक वर्ष 2011 च्या तुलनेत दहापट अधिक आहे. 2011 मध्ये लाभांश 10 रुपये प्रती शेअर होता.

SAIL :
आर्थिक वर्ष 2022 मध्ये, सरकारी मालकीच्या या स्टील कंपनीने आपल्या भागधारकांना 10.8 टक्के लाभांश वितरीत केला आहे. मागील आर्थिक वर्षात सेल कंपनीचा लाभांश प्रति शेअर 2.8 रुपयेच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात 2022 मध्ये 8.8 रुपये प्रति शेअर होता.

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन :
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही भारतातील सर्वात मोठी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी आहे. PFC ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 10.2 टक्के लाभांश वितरीत केला होता. कंपनीने 2022 मध्ये 12 रुपये प्रति शेअर लाभांश दिला होता. 2021 मध्ये 10 रुपये प्रति शेअर आणि 2020 मध्ये 9.5 रुपये प्रति शेअर लाभांश वितरीत केला होता.

REC लिमिटेड :
REC कंपनी ही एक PFC-समर्थित ऊर्जा क्षेत्रातील वित्तीय सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीने 2022 मध्ये 9.3 टक्के लाभांश वितरीत केला होता. कंपनीने आर्थिक वर्ष 2021ते 2022 मध्ये प्रति शेअर 10 रुपये लाभांश दिला होता. 2021 मध्ये प्रति शेअर 11 रुपये आणि 2020 मध्ये प्रति शेअर 8.3 रुपये लाभांश वितरीत केला होता.

HUDCO :
सरकारी मालकीची HUDCO कंपनी गृहनिर्माण वित्त सेवा प्रदान करते आणि शहरी पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडते. 2022 मध्ये या कंपनीनं 8.5 टक्के लाभांश वितरीत केला होता. कंपनीचा लाभांश आर्थिक वर्ष 2022 मध्ये प्रति शेअर 3.5 रुपये होता. 2021 मध्ये प्रति शेअर 2.2 रुपये लाभांशा, आणि 2020 मध्ये प्रति शेअर लाभांश 3.1 रुपये होता.

नॅशनल अॅल्युमिनियम/NALCO :
खाण, धातू आणि उर्जा क्षेत्रात वैविध्यपूर्ण उद्योग करणारी NALCO ही सरकारी मालकीची कंपनी आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या अखेरीपर्यंत या कंपनीनं आपल्या भागधारकांना 8.4 टक्केचा लाभांश वितरीत केला होता. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीने प्रति शेअर 6.5 रुपये लाभांश वितरीत केला होता.

हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स :
IT सेवा व्यवस्थापन करणाऱ्या या कंपनीने आर्थिक वर्ष 2022 मध्ये आपल्या भागधारकांना 8.3 टक्के दराने लाभांश वितरीत केला होता. 2021 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीने 9.5 पट अधिक लाभांश दिला आहे. 2022 मध्ये कंपनीने प्रति शेअर 124 रुपयेचा लाभांश दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Top 10 Dividend stock gives huge dividend on every quarter on 23 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या