22 November 2024 8:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Penny Stocks | या पेनी शेअरने गुंतवणूकदारांचं आयुष्य बदलून गेलं, 1 लाखावर तब्बल 30.73 कोटी रुपयांचा परतावा, नाव नोट करा

Penny Stocks

Penny Stocks | तुम्ही आयुष्यात एकदातरी रॉयल एनफिल्ड ची बुलेट मोटरसायकल चालवली असणार. पण तुम्हाला माहीत आहे का रॉयल एनफिल्ड बुलेट चे उत्पादन करणाऱ्या कंपनीबद्दल? आज या लेखात आम्ही तुम्हाला प्रसिद्ध बुलेट मोटरसायकलची निर्माता कंपनी आयशर मोटर्स बद्दल माहिती देणार आहोत. मागील काही वर्षात आयशर मोटर्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना इतका भरघोस परतावा दिला आहे की, ते आता करोडपती बनले आहेत. या आयशर मोटर्सच्या स्टॉकने आतापर्यंत आपल्या भागधारकांना 3 लाख टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसा कमावण्यासाठी संयमाची आवश्यकता असते. तुमच्यात संयम असला की तुम्ही शेअर मार्केटमधून करोडोचा परतावा मिळवू शकता. आयशर मोटर्सच्या शेअर्सनी मागील 23 वर्षांत आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 3 लाख टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. सुरुवातीच्या काळात आयशर मोटर्सच्या शेअर्सची किंमत फक्त 1.22 रुपये होती, त्यात आता कमालीची वाढ होऊन प्रति शेअर किंमत 3,711.85 रुपये पर्यंत वाढली आहे.

आयशर मोटर्सच्या शेअरची वाटचाल :
आयशर मोटर्स लिमिटेडचा शेअर सध्या 3,711.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 1 जानेवारी 1999 रोजी आयशर मोटर्स कंपनीचे शेअर्स फक्त 1.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या स्टॉकने सुरुवातीच्या किमतीच्या तुलनेत आतापर्यंत 307,281.15 टक्केचा छप्परफाड परतावा मिळवून दिला आहे. म्हणजेच, समजा जर तुम्ही 23 वर्षांपूर्वी आयशर मोटर्स मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक आतापर्यंत होल्ड करून ठेवली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्या 30.73 कोटी रुपये झाले असते.

वार्षिक परतावा :
मागील पाच वर्षांत आयशर मोटर्सच्या स्टॉकमध्ये 20.14 टक्के आणि मागील वर्षाच्या तुलनेत 31.26 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. चालू वर्ष 2022 मध्ये आयशर मोटर्सच्या स्टॉकने वार्षिक दर वाढ प्रमाणे 37.93 टक्के परतावा मिळवून दिला आहे. NSE निर्देशांकावर आयशरच्या स्टॉकची 52 आठवज्ञाची उच्चांक पातळी किंमत 3,787.25 रुपये आहे. त्याच वेळी 08 सप्टेंबर 2022 रोजी आयशर मोटर्स ने 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी किमतीला स्पर्श केला होता. आयशर मोटर्सचा स्टॉक एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग अॅव्हरेज आणि सिंपल मूव्हिंग अॅव्हरेजच्या आधारे 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुविंग एवरेज नुसार ट्रेडिंग करताना दिसला होता.

कंपनी बद्दल सविस्तर :
आयशर मोटर्स लिमिटेड ही आपल्या वाहन प्रेमी ग्राहकाना विचारात घेऊन त्यांच्या मागणीची पूर्तता करणारी ब्लू-चिप कंपनी आहे. आयशर ग्रुप ही रॉयल एनफिल्ड बुलेटची मूळ कंपनी असून, आयशर ग्रुप भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील दिग्गज प्रसिध्द कंपनी आहे. आयशर मोटर्स आणि स्वीडनच्या एबी व्होल्वो यांची व्होल्वो आयशर कमर्शियल व्हेइकल्स लिमिटेड नावाने धोरणात्मक भागीदारी झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Eicher moter share price return in investment on 24 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x