Penny Stocks | 14 रुपयाच्या पेनी शेअरची कमाल आणि गुंतवणूकदार मालामाल, 450 टक्के परतावा प्लस बोनस शेअर्स, पैसा वेगाने वाढतोय
Penny Stocks| केमिकल सेक्टर मधील ह्या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या भागधारकांना खुश केले आहे. ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ह्या मल्टीबॅगर स्टॉकचे नाव आहे “युग डेकोर लिमिटेड”. युग डेकोर कंपनीने नुकताच एक घोषणा केली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. युग डेकोर आपल्या गुंतवणूकदारांना 1:2 या प्रमाणात बोनस वितरीत करणार आहे. म्हणजेच युग डेकोर कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे आपल्या गुंतवणूकदारांना कंपनी प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. युग डेकोर कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख 30 सप्टेंबर 2022 जाहीर केली आहे. या केमिकल कंपनीच्या स्टॉक ची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 93 रुपये आहे.
1 वर्षात दिला 450 टक्केपेक्षा अधिक परतावा :
युग डेकोर कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या भागधारकांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. 18 नोव्हेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकावर 14.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 सप्टेंबर 2022 रोजी युग डेकोर कंपनीचा स्टॉक BSE निर्देशांकावर 93 रुपयांच्या किमतीवर क्लोज झाला होता. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी 450 टक्के पेक्षा अधिक जास्त परतावा दिला आहे. जर तुम्ही 18 नोव्हेंबर 2021 रोजी युग डेकोर कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6.23 लाख रुपये झाले असते.
5 वर्षात दिला 330 टक्के परतावा :
युग डेकोर कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 वर्षात आपल्या भागधारकांना 330 टक्केचा परतावा मिळवून दिला आहे. 4 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबई शेअर बाजारात युग डेकोर कंपनीचे शेअर्स 21.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 सप्टेंबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर हा स्टॉक 93 रुपये किमतीवर बंद झाला होता. या कंपनीच्या शेअर्सनी चालू वर्ष 2022 मध्ये 440 टक्केचा अमेजिंग परतावा कमावून दिला आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 4 जानेवारी 2022 रोजी युग डेकोर कंपनीचा शेअर बीएसई निर्देशांकावर केवळ 17.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आणि कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये ह्या शेअर्स ची किंमत 93 रुपये नोंदवण्यात आली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stocks of Yug Decor Share Price return on 24 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार