SBI FD Vs Post Office Scheme | SBI की पोस्ट ऑफिस? कुठे मिळेल जास्त परतावा? फायदा कुठे आणि पैसा कुठे अधिक मिळेल जाणून घ्या
SBI FD Vs Post Office Scheme| आजकाल लोकांना आपली बचत चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करून भरघोस परतावा कमवायचा असतो, त्यासाठी लोक अनेक गुंतवणूक योजनेत, आणि शेअर मार्केटमध्ये पैसे लावतात. परंतु शेअर मार्केटमध्ये पैसे लावणे जोखीमचे आहे, त्यामुळे काही लोक अजूनही एफडी म्हणजेच मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करतात. गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते लोक FD मधूनही हवा तसा नफा कमवू शकत नाहीत म्हणून आज आम्ही तुम्हाला गुंतवणूक कोणत्या FD योजनेत करावी, याची सविस्तर माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्ही चांगला फायदा मिळू शकेल.
FD vs Time Deposit :
बँकांच्या किंवा पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे आहे की नाही, ह्यात संभ्रमात लोक असतात. तुम्हीही अशाच गोंधळाला सामोरे जात असला तर, आज आम्ही तुम्हाला कोणत्या FD योजनेत गुंतवणूक करावी, हे सविस्तर सांगणार आहोत,जेणे करून तुम्ही चांगला फायदा कमवू शकता. सर्वप्रथम एफडी मधील फरक समजून घ्या. बँकांमध्ये ठराविक वेळेसाठी जमा केलेल्या पैशाला मुदत ठेव म्हणजे टर्म डेपोझिट म्हणतात.आणि पोस्ट ऑफिसमध्ये ठराविक काळासाठी जमा केलेल्या रकमेला “पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट” असे म्हणतात.
Post Office FD वर व्याज परतावा :
तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये 1 वर्ष ते 5 वर्ष या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. योजनेत पैसे गुंतवणूक केल्यास 1 वर्ष ते 3 वर्ष मुडतीच्या ठेवीवर 5.5 टक्के व्याज परतावा मिळतो. 3 वर्षावरील गुंतवणुकीवर 6.7 टक्के व्याज परतावा मिळतो. जर समजा तुमच्या पोस्ट ऑफिस खात्यात 8 लाख 35 हजार रुपये जमा आहेत, 6.7 टक्के व्याज दराने परतावा जोडून तुम्हाला पण 3 वर्षांनंतर 10 लाख 19 हजार रुपयांहून अधिक परतावा मिळेल. यामध्ये तुमची गुंतवणूक 8 लाख 35 हजार असेल आणि तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 1 लाख 84 हजार 194 रुपयांचा व्याज परतावा मिळेल.
SBI च्या FD वर 6.10 टक्के व्याज परतावा :
जर तुम्ही ग्रामीण भागातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI मध्ये FD गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.10 टक्के वार्षिक व्याज परतावा मिळेल. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना 6.60 टक्के व्याज दिला जातो. जर तुम्ही या FD मध्ये गुंतवणूक केली आणि 3 वर्षांसाठी 8 लाख 35 हजार रुपये जमा केले तर 6.10 टक्के व्याज दराने तुम्हाला 10 लाखांपेक्षा जास्त परतावा मिळेल. दरम्यान, तुमची एकूण गुंतवणूक 8 लाख 35 हजार असेल, आणि त्यावर तुम्हाला 1 लाख 66 हजार रुपये व्याज परतावा दिला जाईल.
पोस्ट ऑफिस उत्तम आहे :
आता SBI आणि पोस्ट ऑफिस च्या मुदत ठेव योजनेची तुलना केली तर गुंतवणुकीच्या दृष्टीने पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेत अधिक परतावा मिळतो. SBI च्या FD मध्ये 3 वर्षांसाठी 6.10 टक्के दराने व्याज परतावा दिला जातो. तर पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत 6.7 टक्के व्याज परतावा मिळतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केली पाहिजे, कारण त्यावर SBI च्या FD पेक्षा अधिक व्याज परतावा मिळतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| SBI FD Vs Post Office Scheme for investment with higher returns on 26 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार