22 November 2024 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Multibagger Stocks | हा शेअर देत आहे सुपर से उपर परतावा, 1 लाखाचे झाले 53 लाख, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Multibagger Stocks

Multibagger Stocks | भारतीय लोकांच्या पसंतीची वाहन कंपनी मारुती सुझुकी भारतात अतिशय लोकप्रिय कंपनी आहे. जेव्हा आपण कार खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा सर्वात आधी आपल्या मनात मारुती सुझुकीचा विचार येतो. भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात सुमारे 50 टक्क्याहून अधिक वाटा मारुती सुझुकी कंपनीचा आहे. यावरूनच आपल्याला लक्षात येईल की मारुती सुझुकी कंपनी भारतात किती लोकप्रिय आहे. मारुती सुझुकी कंपनीची शेअर बाजारातील कामगिरी अतिशय उत्तम प्रकारची राहिली आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 2,28,260.59 कोटी रुपये आहे.

मारुती सुझुकीचा शेअरचा इतिहास :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मारुती सुझुकी कंपनीचे शेअर्स 0.87 टक्क्यांनी घसरले असून शेअर 9,320 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 11 जुलै 2003 पासून आतापर्यंत मारुती सुझुकी कंपनीच्या शेअरमध्ये 5,276.41 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 11 जुलै 2003 रोजी मारुती सुझुकी कंपनीचा शेअर 173.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. म्हणजेच, जर तुम्ही 11 जुलै 2003 रोजी मारुती सुझुकी कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 53.76 लाख रुपये झाले असते. मागील 19 वर्षात या शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना एक लाखावर 52 लाखांचा भरघोस परतावा मिळवून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ की मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे आपल्यासाठी फायदेशीर राहील की नाही?

मारुती सुझुकी वर तज्ञांचे मत :
ब्रोकरेज फर्म एडलवाईस वेल्थ रिसर्चने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मारुती सुझुकीच्या स्टॉक मध्ये पुढील येणाऱ्या काळात जबरदस्त वाढ होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूक तज्ञ मारुती सुझुकीच्या स्टॉकबाबत अतिशय सकारात्मक आहेत. ब्रोकरेज फर्म एडलवाईस वेल्थ ने मारुती सुझुकीचा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एडलवाईस वेल्थ ब्रोकरेज फर्मने मारुती सुझुकीच्या शेअर्सची टारगेट प्राईस 10,322 रुपये जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मला पूर्ण विश्वास आहे की य कंपनीच्या SUV मॉडेलची जबरदस्त मागणी वाढेल आणि चांगली विक्री होईल, त्यामुळे कंपनीचे मार्जिनही वाढेल.

शेअर्सची वाटचाल :
मागील पाच वर्षात मारुती सुझुकी कंपनीच्या शेअरमध्ये 16.82 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. त्याचवेळी,मागील 3 वर्षात मारुती सुझुकीच्या शेअर्सची किमत 35.45 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका वर्षात मारुती सुझुकीच्या शेअर्सनी आपल्या भागधारकांना 25.89 टक्क्यांचा जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. चालू वर्ष 2022 मध्ये शेअर बाजारत अस्थिरतेचे वातावरण असूनही मारुती सुझुकी कंपनीच्या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत मारुतीचा शेअर 23.87 टक्क्यांनी महाग झाला आहे. NSE निर्देशांकावर Maruti Suzuki कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 9,451 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 6,536.55 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Maruti Suzuki share Investment returns on 27 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x