22 November 2024 7:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Investment Tips | या सरकारी योजनेत 253 रुपये गुंतवा आणि मॅच्युरिटीला 54 लाख मिळतील, फायद्याची योजना सविस्तर जाणून घ्या

Investment Tips

Investment Tips | सध्याच्या महागाई काळात आपल्या गरजा कमी होत नाही, पण त्यांची किंमत दिवसेंदिवस वाढत जाते. तुटपुंज्या पगारातून आपल्या गरजा भागवणे आणि बचत करणे खूप कठीण जाते. आणि त्यातून गुंतवणूक करण्याचा विचार तर डोक्यात सुधा येत नाही. अश्या वेळी आपण आर्थिक रित्या कमकुवत होत जातो. आपल्या आर्थिक गरजांपैकी , बचत आणि जीवन विमा ह्या महत्वाच्या आहेत. थोडीफार तडजोड करून बचत केली तर अडचणीच्या वेळी बचत रक्कम तुमचे मोठे खर्च भागवण्यास मदत करते आणि दुसरे म्हणजे जीवन विमा तुमच्या कुटुंबाला कोणत्याही अनुचित घटना आणि संकटापासून आर्थिक संरक्षण प्रदान करते. एलआयसी तुम्हाला एका नवीन योजनेतून बचत आणि जीवन विमा हे दोन्ही लाभ प्रदान करते. “LIC जीवन लाभ योजना” अशी एक योजना आहे, ज्यात तुम्ही पैसे बचत करू शकता आणि त्यावर तुम्हाला जीवन विमा सुरक्षा लाभ देखील दिला जातो. जर तुम्ही या जीवन लाभ योजनेत दररोज 253 रुपये जमा केले तर भविष्यात तुम्ही 54 लाख रुपये सहजपणे मिळवू शकता.

योजनेचे वैशिष्ट्ये :
LIC जीवन लाभ योजनेत गुंतवणूक करून दीर्घकालीन आर्थिक संरक्षणाच लाभ घेण्यासाठी ग्राहकांना ठराविक मुदतीसाठी प्रीमियम जमा करावी लागेल. जर पॉलिसीधारक या योजनेत 2 वर्षांसाठी नियमित गुंतवणूक करत असतील तर तुम्ही या योजनेवर कर्ज घेण्यासही पात्र होऊ शकता. तुम्ही कर्ज सरेंडर मूल्यावर 90 टक्केपर्यंत सवलत मिळवू शकता. LIC जीवन लाभ योजना तुम्हाला 5 वर्षे, 10 वर्षे किंवा 15 वर्षांच्या हप्त्यांमध्ये मॅच्युरिटी बेनिफिट (मुदतपूर्ती परतावा) मिळवण्याचा पर्याय देखील देते.

योजना लाभ :
जर ही तुम्ही या योजनेत आपल्या पाल्यासाठी गुंतवणूक करत असाल तर पालक एलआयसीच्या प्रीमियम वेव्हर बेनिफिट रायडरला पॉलिसीमध्ये जोडू शकतात. समजा त्या पाल्याचे आई-वडील गेले तर भविष्यातील प्रीमियम्स किंवा देय रक्कम LIC द्वारे माफ केले जाईल. भविष्यात पॉलिसी सुरू ठेवण्यासाठी मुलावर कोणतेही आर्थिक ओझे पडणार नाही. प्रीमियमची वार्षिक रक्कम 5 लाख रुपये किवा त्याहून अधिक असल्यास, प्रीमियमवर सूट दिली जाईल.

54 लाख रुपयांचा परतावा कसा मिळवाल?
समजा जर योजना धारकाने LIC ची जीवन लाभ पॉलिसी वयाच्या 25 वय असताना सुरू केली आणि त्याला जर मॅच्युरिटीवर 54 लाख रुपये मिळवायचे असेल तर त्याला पॉलिसी 25 वर्षे भरावी लागेल. जीवन विम्यासाठी त्याला 20 लाख रुपयांची रक्कम निवडावी लागेल. हा लाभ मिळवण्यासाठी त्या व्यक्तीला दरवर्षी 92,400 रुपये प्रीमियम म्हणून जमा करावे लागेल. प्रत्येक महिन्याची प्रीमियम रक्कम 7,700 रुपये असेल त्यामानाने गुंतवणूकदाराला रोज 253 रुपये जमा करावे लागेल. यानंतर, जेव्हा तुमची पॉलिसी परिपक्व होईल, त्यावर तुम्हाला 54.50 लाख रुपये परतावा मिळेल.

आयकर सवलत लाभ :
एका आर्थिक वर्षात पॉलिसीसाठी प्रीमियम म्हणून जमा केलेली दीड लाख रुपये रक्कम आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करमुक्त असेल. म्हणजेच तुम्हाला 1.5 लाख रुपये पर्यंत केलेल्या गुंतवणुकीवर कोणताही आयकर भरावा लागणार नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment Tips on LIC Jeevan Labh Yojana benefits check details on 27 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x