22 November 2024 6:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे
x

Hot Stocks | या शेअरचं नाव नोट करा, फक्त 3 महिन्यांत 54 टक्के परतावा, टॉप ब्रोकरेजने दिला खरेदीचा सल्ला

Hot Stocks

Hot Stocks | शेअर बाजारात अनिश्चितता, अस्थिरता आणि विक्रीचा दबाव आहे. नकारात्मक जागतिक भावनांमुळे शेअर बाजार विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. तथापि, या बाजारातील अस्थिरतेत, ब्रोकरेज फर्मने काही जबरदस्त शेअर्स सुचवले आहेत ज्यांचे मूलभूत तत्त्व मजबूत असून बाजारातील अस्थिरतेचा आणि जागतिक नकारात्मक भावनेचा त्यांच्यावर फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही. त्यापैकी एक प्रोफिटेबल स्टॉक म्हणजे ‘इंडसइंड बँक’. बँकिंग क्षेत्रातील एक दिग्गज स्टॉक म्हणून इंडसइंड बँक ओळखली जाते. भारतातील सर्वात मोठ्या दोन ब्रोकरेज फर्म नी हे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांचा अंदाज आहे की हा स्टॉक पुढील काळात 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की प्रत्येक व्यवसायात या बँकेची कामगिरी चांगली आहे. क्रेडिट कॉस्ट कमी झाल्यामुळे बँकेच्या नफ्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. बँकेचा बाजारतील वाटाही वाढत आहे.

मोतीलाल ओसवाल यांचा अहवाल :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या ग्राहकांना इंडसइंड बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकसाठी 1450 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. सध्याच्या 1111.60 रुपये बाजार भाव नुसार हा स्टॉक 25 टक्के अधिक परतावा देऊ शकतो. या बँकेची वाढ स्थिर असल्याचे तज्ञ सांगतात. त्याच वेळी, डोमेन सेक्टरमध्ये या बँकेचा बाजारातील वाटा सतत वाढताना दिसत आहे. कर्जासह प्रत्येक व्यवसायात बँकेने चांगली प्रगती केली आहे. लायबिलिटी फ्रँचायझीमध्येही स्थिर सुधारणा झाली असून क्रेडिट कॉस्ट कमी होत आहे.याचा अर्थ बँक पुढील काळात अधिक चांगला नफा देण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2022-2024 मध्ये इंडसइंड बँकेच्या PAT म्हणजेच कार कपातीनंतरचा नफा वाढून 39 टक्के CAGR झाला आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये RoA/RoE अनुक्रमे 1.9 टक्के/15.7 टक्के वर राहण्याचा अंदाज आहे.

ICICI सिक्युरिटीजचा अहवाल :
ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने इंडसइंड बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि ICICI सिक्युरिटीज या शेअर्सची पुढील टारगेट प्राइज 1420 रुपये निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की इंडसइंड बँकेचे ROA आणि ROI सकारात्मक राहण्याचा अंदाज आहे. MFI कर्जामध्ये सुधारणा होत असून SMEs मध्ये बँकेचा बाजारातील वाटा वाढताना दिसत आहे. वाहन आणि क्रेडिट कार्ड विभागातही बँकेने चांगली कामगिरी केली आहे. कर्जदरात वाढ झाली असून बँकेच्या पोर्टफोलिओमधे समिश्र बदल दिसून येत आहेत. C/D गुणोत्तरामध्ये वाढ झाल्याचे आपण पाहू शकतो. NIM अल्पावधीत स्थिर राहू शकतात, आणि पुढील काळात स्टॉकमध्ये चांगली वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hot Stocks of IndusInd Bank share price return on investment on 27 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x