17 April 2025 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

Stocks to Buy | बँक तुम्हाला एफडी'वर किती व्याज देईल?, हे 2 शेअर्स 70 टक्के पर्यंत परतावा देऊ शकतात, स्टॉकची नावं नोट करा

Stocks To buy

Stock To Buy | मागील 1 वर्षापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता असली तरी गुजरातमधील काही कंपन्यांची वाटचाल बदलल्याचे पाहायला मिळत आहे. मागील 1 वर्षात गुजरातमधील काही कंपन्यांचे शेअर्स जबरदस्त पडले होते, पण आता ते आकर्षक बाजार भावावर आले आहेत. ही किंमत खरेदी करण्यासाठी योग्य आहे. नजीकच्या काळात शेअर बाजारात पडझड सुरच राहील अशी शक्यता दिसून येत आहे. पण तरीही ह्या शेअर्समध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्ही भरघोस परतावा कमवू शकता हे नक्की.

आज आपण या लेखात अशा दोन स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत हे सध्या आकर्षक बाजार भावावर ट्रेड करत आहेत. या स्टॉकचे नाव आहे ‘गुजरात स्टेट पेट्रोनेट’ आणि ‘गुजरात गॅस’. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. गुजरात स्टेट पेट्रोनेटमध्ये मागील एका वर्षभरात 28 टक्केची घसरण झाली आहे. तर गुजरात गॅसचा स्टॉक 1 वर्षात 17 टक्के खाली पडला आहे.

Gujarat State Petronet :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ मध्ये सामील करण्याचा सल्ला दिला आहे. ICICI सिक्युरिटीजने या शेअर्सवर 375 रुपयांची टारगेट प्राईज निश्चित केली आहे. सध्या ह्या स्टॉकची ट्रेडिंग किंमत 222 रुपये असून जर ह्याने टारगेट किंमत गाठली तर गुंतवणूक करणाऱ्याला सुमारे 70 टक्के परतावा होऊ शकतो. हा स्टॉक दीर्घ मुदतीत गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार ह्या शेअरचे मूल्यांकन अतिशय आकर्षक आणि गुंतवणुकीसाठी योग्य आहे. हे सध्या हा स्टॉक EPS 3.2X EV/EBITDA वर ट्रेड करत आहेत. ब्रोकरेजने आर्थिक वर्ष 2023 आणि आर्थिक वर्ष 2024 साठी सुधारित EPS अनुक्रमे -11 टक्के आणि -5 टक्के जाहीर केले आहेत. दीर्घकालीन खंड आणि दर समायोजनमध्ये 10 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.

Gujrat Gas Limited :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने Gujrat Gas Limited स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ मध्ये सामील करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या स्टॉकची लक्ष किंमत 535 रुपये निश्चित केली आहे. सध्या हा स्टॉक 487 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर पुढील काळात ह्या स्टॉकने आपली लक्ष किंमत गाठली तर गुंतवणूकदार यातून किमान 10 टक्के परतावा सहज कमवू शकतात. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की येणाऱ्या काळात ह्या स्टॉकमध्ये कमालीची वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु आपल्या इतर स्पर्धात्मक पियर्स स्टॉकच्या तुलनेत गुजरात गॅस हा स्टॉक फार चांगला आहे. पुढील 7 ते 8 वर्षांत ही कंपनी जबरदस्त नफ्यात येऊ शकते असे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे. एलएनजी आणि एलपीजीच्या किमतींमध्ये विक्रमी फरक असल्यामुळे कंपनीच्या मार्जिनवर नकारात्मक परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे, परंतु ते लवकरच सामान्य होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील 12 महिने या स्टॉकबाबत सावध दृष्टीकोन ठेऊन गुंतवणूक करावी, परंतु पुढे जाऊन शेअरमध्ये जबरदस्त वाढ दिसून येईल ह्यात अजिबात शंका नाही. ब्रोकरेज फर्मने आर्थिक वर्ष 2023 आणि आर्थिक वर्ष 2024 साठी EPS अंदाज अनुक्रमे -0.1 टक्के आणि -2.3 टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To buy recommended by ICICI securities check details on 28 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या