22 November 2024 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Penny Stocks | 16 रुपयांचा शेअर गुंतवणूकदारांचा पैसा पटीत वाढवतोय, सातत्यानं अप्पर सर्किट, गुंतवणुकीची संधी सोडू नका

Penny Stocks

Penny Stocks | सध्या भारतीय आणि जागतिक शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. अश्या घसरणीतही बाजारात काही शेअर्स तेजीत आले आहेत. या शेअर्सनी गुंतवणूकदारांचेच नाही तर आर्थिक तज्ञांचे ही लक्ष वेधून घेतले आहे. अश्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाढणाऱ्या शेअर्स च्या यादिती “ग्रीनक्रेस्ट फायनान्शियल सर्व्हिसेस” हा स्टॉक सर्वात टॉपवर आहे. हा एक पेनी स्टॉक असून ह्याने आपल्या गुंतवणूकदारांना खूप कमी काळात मल्टीबॅगर परतावा कमवून दिला आहे. आतापर्यंत ह्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊन मालामाल केले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये BSE निर्देशांकावर हा स्टॉक 16.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 16.51 रुपये ही या स्टॉक ची एका वर्षातील सर्वोच्च पातळी किंमत आहे.

अप्पर सर्किट ट्रेड :
ह्या स्टॉक बद्दल विशेष बाब म्हणजे हा शेअर मागील दीड महिन्यांपासून ट्रेडिंग सेशनमध्ये सातत्याने 2 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे. 27 सप्टेंबर रोजी कंपनीने शेअर स्टॉक स्प्लिट च्या रेकॉर्ड तारखेबद्दल स्टॉक एक्सचेंजला माहिती कळवली आहे. ग्रीनक्रेस्ट फायनान्शिअल सर्व्हिसेसने 12 ऑक्टोबर 2022 ही स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. स्टॉक स्प्लिटनंतर या कंपनीच्या स्टॉकचे दर्शनी मूल्य 10 रुपयेवरून 1 रुपयेवर येईल.

शेअरमधील वाढ :
ग्रीनक्रेस्ट फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून लोकांनी भरघोस परतावा कमावला आहे. मागील एका वर्षात या स्टॉकमध्ये 231.53 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. 8 ऑगस्ट 2022 पासून हा स्टॉक सातत्याने अप्पर सर्किटचवर ट्रेड करत आहे. ह्या शेअर मध्ये सातत्याने जबरदस्त वाढ होत आहे. कंपनीचे एकूण बाजार भांडवल 60.35 कोटी रुपये नोंदवण्यात आले आहे.

कंपनीचा व्यवसाय सविस्तर :
ग्रीनक्रेस्ट फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी वित्तीय सेवा उद्योगात गुंतलेली आहे. या कंपनीचे नाव आधी मॅरिगोल्ड ग्लास इंडस्ट्रीज लिमिटेड असे होते आणि 2013 मध्ये कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. ग्रीनक्रेस्ट कंपनी BSE आणि कोलकाता स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाली आहे. कंपनी आपला अतिरिक्त फंड स्टॉक, शेअर्स, आणि सिक्युरिटीजमध्ये गुंतवते आणि त्यातून नफा कमावते. BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध शेअरहोल्डिंग डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सकडे 1.25 टक्के मालकी वाटा आहे.

शेअरची किंमत 700 रुपये प्रति शेअर होती :
ऑक्टोबर 2017 मध्ये Greencrest Financial Services कंपनीच्या शेअरची किंमत 700 रुपये प्रति शेअर होती. या उच्चांक किंमत पातळीपासून, हा शेअर 8 रुपयांच्या नीचांक पातळीवर आला होता. सध्या हा स्टॉक 16.51 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Greencrest Financial Services share price return on investment on 29 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x