22 November 2024 1:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Swastik Pipe IPO | स्वस्तिक पाईप्स कंपनीचा IPO लाँच होणार, गुंतवणुकीची संधी आली, सर्व तपशील जाणून घ्या

Swastik Pipe IPO

Swastik Pipe IPO | जागतिक घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारात विक्रीचा बडव वाढला असून, शेअर बाजार अस्थिर झाला आहे. परिणाम स्वरूप शेअर बाजारात घसरण झाली आहे. गुंतवणूकदार बऱ्याच काळापासून आपल्या नुकसानीची भरपाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता गुंतवणूकदारांना अशी एक संधी भेटी शकते. शेअर बाजारात लवकरच एक नवीन खुला केला जाणार आहे. IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आपल्या नुकसानीची भरपाई करण्याची ही एक चांगली संधी मिळणार आहे. स्वस्तिक पाइप लिमिटेडचा IPO 29 सप्टेंबर रोजी गुटवणुकीसाठी केला जाईल. हा IPO ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. चला जाणून घेऊया कंपनीच्या प्राइस बँडबद्दल आणि कंपनीच्या उद्योगाबद्दल सविस्तर.

IPO मध्ये शेअरची किंमत :
Swastik Pipe कंपनीचा IPO 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. जर तुम्ही या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागारासोबत सल्लामसलत करून IPO साथी अर्ज करू शकता. Swastik Pipe कंपनीने IPO साठी आपल्या शेअरची किंमत 97 रुपये ते 100 रुपयां दरम्यान निश्चित केली आहे. या IPO साठी कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये प्रति शेअर ठरवण्यात आले आहे. Swastik Pipe कंपनीने आपल्या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी IPO मध्ये 50 टक्के कोटा राखीव ठेवला आहे. कंपनी आपल्या शेअरचे वितरण सात ऑक्टोबर रोजी पूर्ण करेल. स्वस्तिक पाईप कंपनीचा IPO शेअर बाजारात 12 ऑक्टोबर रोजी सूचीबद्ध केला जाईल.

कंपनी बद्दल सविस्तर :
Swastik pipe कंपनी 1973 सालापासून सॉफ्ट स्टील आणि कार्बन स्टील इलेक्ट्रिक-रेझिस्टन्स-वेल्डेड (ERW) ब्लॅक आणि गॅल्वनाइज्ड पाईप्स आणि ट्यूब्सचे उत्पादन आणि निर्यात करण्याच्या उद्योगात गुंतलेली आहे. कंपनीचे हरियाणा आणि उत्तर प्रदेश राज्यात दोन मोठे उत्पादन उत्पादन केंद्र कार्यरत आहेत. या उत्पादन केंद्रांची ज्या क्षमता दरमहा 20,000 मेट्रिक टन आहे. IPO मधून जमा केलेला पैसा कंपनी आपल्या खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी वापरेल. Swastik Pipe कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये भारतातील अनेक दिग्गज कंपनीचा समावेश होतो. त्यात मुख्यतः रिलायन्स इंडस्ट्रीज, BHEL, COAL India, DMRC, EIL, हिंदुस्तान झिंक, L &T, नाल्को, NTPC, ABB लिमिटेड अश्या मोठ्या कंपनीचा समावेश होतो. Swastik Pipe चा उद्योग जगभर पसरलेला आहे, त्यापैकी प्रमुख देश USA, UK, UAE, ऑस्ट्रेलिया, कतार, जर्मनी, बेल्जियम, मॉरिशस, इथिओपिया आणि कुवेतसह अनेक देशांमध्ये उद्योग करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

 News Title| Swastik Pipe IPO is ready to open for Bid in Stock market on 30 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x