22 November 2024 7:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

Penny Stocks | या शेअरने 123,639 टक्के परतावा दिला, 10 हजारावर तब्बल 1.23 कोटी परतावा, स्टॉकचे नाव लक्षात ठेवा

Penny stocks

Penny Stocks | सध्या शेअर बाजारात अतिशय चाड उतार दिसून येत आहे. मार्केट थोडाफार सावरला की, त्यानंतर आणखी पडझड सुरू होते. RBI चे मुद्रा धोरण घोषित करण्यापूर्वी शेअर बाजारात भयंकर घसरण दिसून आली. 29 सप्टेंबर 2022 रोजी शेअर बाजार अत्यंत खाली पडून बंद झाला होता. आज RBI चे पतधोरण जाहीर झाल्यावर बाजारात कमालीची वाढ दिसून येत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये सेन्सेक्स 188.32 अंकांनी म्हणजेच 0.33 टक्क्यांनी पडून 56,409.96 अंकावर बंद झाला होता. निफ्टी 50 मध्ये 40.50 अंकांची म्हणजेच 0.24 टक्क्यांची घट झाली आणि निर्देशांक 16,818.10 अंकावर बंद झाला. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1775 शेअर्स वाढले होते, तर 1435 शेअर्स मध्ये जबरदस्त पडझड झाली होती.102 शेअर्स असे होते ज्यात कोणताही बदल झाला नाही.

कालची मार्केट परिस्तिथी :
एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो आणि टायटन कंपनीचे शेअर्स सर्वता जास्त पडले होते. दुसरीकडे, ONGC,ITC, अपोलो हॉस्पिटल्स, हिंदाल्को इंडस्ट्रीज आणि HDFC लाइफ, यासारख्या शेअर्स मध्ये वाढ दिसून आली होती. तथापि, गुंतवणूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की स्टॉक मार्केट हा काही एक दिवसाचा खेळ नाही, स्टॉक मधून पैसे कमवायचे असतील तर दीर्घकालीन गुंतवणूक हाच सर्वोत्तम पर्याय आहे. बहुतेक स्टॉक दीर्घ कालावधीत जबरदस्त परतावा कमवून देतात. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा कमावून दिला आहे.

बजाज फायनान्स :
आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे, “Bajaj Finance”. हा स्टॉक मागील 20 वर्षांपासून आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा देत आला आहे. 05 जुलै 2002 रोजी NSE निर्देशांकावर बजाज फायनान्सचा स्टॉक 5.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या ह्या स्टॉक ची किंमत 7115 रुपये आहे. या कालावधीत या बजाज फायनान्सच्या या स्टॉकमध्ये 123,639.13 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. म्हणजेच या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1236 पट अधिक वाढवले आहेत. या शेअर मध्ये फक्त 10000 रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 1.23 कोटी रुपये परतावा मिळाला आहे.

मागील 10 वर्षाचा एकूण परतावा :
Bajaj Finance च्या स्टॉकने मागील 10 वर्षात अप्रतीम वाढ दर्शवली आहे. 28 सप्टेंबर 2012 रोजी NSE निर्देशांकावर Bajaj Finance कंपनीचा शेअर 117.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, सध्या ह्या शेअरची किंमत 7115 रुपये आहे. या कालावधीत या स्टॉकच्या किमतीत 5930.68 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. म्हणजेच या मल्टीबॅगर स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 59 पट अधिक वाढवले आहेत. या शेअर मध्ये एक लाख गुंतवणूक केलेल्या लोकांचे पैसे सध्या 60 लाखांपेक्षा जास्त वाढले असतील.

मागील 5 वर्षाचा परतावा :
बजाज फायनान्सच्या शरसा मागील 5 वर्षात आपल्या भागधारकांना कमालीचा परतावा कमवून दिला आहे. 6 ऑक्टोबर 2017 रोजी NSE निर्देशांकावर हा स्टॉक 1923.6 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये हा स्टॉक 7115 रुपये किमतीवर बंद झाला होता. मागील पाच वर्षात ह्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 270 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. म्हणजेच या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 3.70 पटीने वाढवले आहेत. पाच वर्षांपूर्वी ज्यांनी ह्या स्टॉक मध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 3.70 लाख रुपये परतावा मिळाला असणार.

शेअरमध्ये कमालीची स्थरीता :
Bajaj Finance चा शेअर्स सध्या वाढतही नाही आणि पडत ही नाही. स्टॉक मध्ये स्थिरता दिसून येत आहे. मागील 1 वर्षापासून बजाज फायनान्सचा स्टॉक कमी जास्त प्रमाणत आपल्या सध्याच्या किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात स्टॉक मध्ये 7.21 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. चालू वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत शेअर्स मध्ये 1.45 टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील 6 महिन्यांत Bajaj Finance चा शेअर 1.89 टक्क्यांनी पडला आहे. मागील एका महिन्यात शेअर 2.62 टक्क्यांनी पडला असून गेल्या 5 दिवसांत स्टॉकमध्ये 7.14 टक्क्यांची पडझड झाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 4.29 लाख कोटी रुपये नोंदवण्यात आले आहे. शेअर्स ची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 8050 रुपये आणि नीचांक पातळी किंमत 5220 रुपये होती.

कंपनीबद्दल थोडक्यात :
बजाज फायनान्स लिमिटेड ही कंपनी 35 वर्षे जुनी असून बजाज फिनसर्व्हची उपकंपनी आहे. Bajaj Finance ही एक भारतीय नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी म्हणजेच NBFC कंपनी आहे, जीचे मुख्यालय पुणे स्थित आहे. ही कंपनी भारतातील प्रसिद्ध उद्योग समूह बजाज ग्रुपचा एक भाग आहे. या कंपनीची सूरुवात 1987 साली झाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny stocks of Bajaj Finance share price on 30 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x