22 November 2024 5:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Motorola G72 Smartphone | मोटोरोला G72 स्मार्टफोन भारतात लाँच होतोय, 108 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह अनेक फीचर्स

Motorola G72 Smartphone

Motorola G72 Smartphone | मोटोरोला आपला नवा जी सीरिज स्मार्टफोन मोटो G72 ३ ऑक्टोबर २०२२ रोजी भारतात लाँच करणार आहे. या नव्या स्मार्टफोनच्या लाँचिंगची आणि फीचर्सची माहितीही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर देण्यात आली आहे. मोटोरोलाच्या नव्या जी सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये १०८ एमपी कॅमेरा तसेच ५० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ३३ वॉट फास्ट चार्जरही यात देण्यात येत आहे. लाँचिंगनंतर मोटोरोला जी 72 हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट या ऑनलाईन स्टोअरवरही खरेदी करता येणार आहे. मोटोरोला जी ७२ उल्काईट ग्रे आणि पोलर ब्लू रंगात उपलब्ध असेल.

मोटोरोलाच्या नव्या स्मार्टफोनमध्ये हे फीचर्स :
मोटोरोलाने आपल्या आगामी स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल माहिती देताना म्हटले आहे की, मोटो जी 72 चे डिस्प्ले सेंटर पंच-होल पाओलेडने सुसज्ज असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज असेल. १,३०० निट्स ब्राइटनेससह या नव्या फोनच्या डिस्प्लेला एचडीआर १० सपोर्ट मिळणार आहे. मोटोरोला जी 72 स्मार्टफोनला इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर आणि स्मार्टफोन अनलॉक आणि अॅक्सेस करण्यासाठी आयपी 52-रेटेड वॉटर रिपेलेंटचा सपोर्ट मिळेल.

108 एमपी प्रायमरी कॅमेरा :
फोटोग्राफीसाठी मोटोरोला जी 72 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असणार आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 108 एमपी असेल. याशिवाय अल्ट्रा वाइड कॅमेरा असणार आहे. ज्यामध्ये दोन सेन्सर – डेप्थ सेन्सर आणि मॅक्रो सेन्सर लावण्यात येणार आहेत. मोटो जी ७२ स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ९९ चिपसेटचा प्रोसेसर मिळू शकतो. ६ जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड १२ ऑपरेटिंग सिस्टम आणि ५,० एमएएच बॅटरी देखील मिळेल. फोनसोबत ३३ वॉट फास्ट चार्जरही मिळणार आहे. यात डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह मोठ्या आकाराचे दोन स्पीकर्स असणार आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Motorola G72 Smartphone price on Flipkart check details 01 October 2022.

हॅशटॅग्स

#Motorola G72 Smartphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x