22 November 2024 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Axis Mutual Fund | अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या या टॉप 5 योजना पैसा तिप्पट करत आहेत, 500 रुपयाच्या एसआयपी'ने पैसा वाढवा, योजना नोट करा

Axis Mutual fund

Axis Mutual Fund | भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या म्युचुअल फंड बाजारात लाँच करत असते. या फंड हाऊसने आतापर्यंत अशा अनेक म्युचुअल फंड योजना बाजारात आणल्या आहेत, ज्या 10 वर्षांहूनही जुन्या आहेत,आणि अजूनही चालू आहेत. इक्विटी म्युचुअल फंड व्यतिरिक्त, अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाद्वारे आपल्या ग्राहकांना डेट फंड देखील ऑफर केले जाते.

अ‍ॅक्सिस  म्युच्युअल फंडाच्या इक्विटी म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करून लोकांनी आपले पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. या म्युच्युअल फंड योजनामध्ये गुंतवणूक करून लोकाची संपत्ती फक्त 5 वर्षांत दुप्पट, तिप्पट पटींनी वाढली आहे. हा अप्रतिम परतावा लोकांनी दीर्घकाळ सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट पद्धतीने म्हणजेच SIP गुंतवणूक करून कमावला आहे. आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी 5 बेस्ट म्युचुअल फंड निवडले आहेत, ज्यांनी मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. विशेष बाब म्हणजे या योजनांमध्ये फक्त 500 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करता येते.

Axis Mid-Cap Fund :
अॅक्सिस मिडकॅप फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी मागील 5 वर्षांत 26.45 टक्के वार्षिक परतावा कमावला आहे. या म्युच्युअल फंड योजनेत ज्या लोकांनी 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 3.23 लाख रुपये झाले आहे. त्याच वेळी, ज्या लोकांनी या योजनेत 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक सुरू केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 12.25 लाख रुपये झाले आहे. या योजनेत फक 500 रुपये जमा करून तुम्ही SIP गुंतवणूक सुरू करू शकता.

Axis Small-Cap Fund :
अॅक्सिस स्मॉल कॅप फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी मागील 5 वर्षात 25.46 टक्के वार्षिक परतावा कमावला आहे. या म्युच्युअल फंड योजनेत या लोकांक 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 3.11 लाख रुपये झाले आहे. त्याच वेळी, ज्या लोकांनी या योजनेत 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 12.90 लाख रुपये झाले आहे. या योजनेत फक्त 500 रुपये मासिक जमा करून SIP गुंतवणूक करता येते.

Axis Focused 25 Fund :
मागील 5 वर्षात अॅक्सिस फोकस्ड 25 फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी 23.30 टक्के वार्षिक परतावा कमावला आहे. या योजनेत ज्या लोकानी 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 2.85 लाख रुपये झाले आहे. त्याच वेळी, ज्या लोकांनी या योजनेत 10,000 मासिक SIP गुंतवणूक सुरू केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 10.85 लाख रुपये झाले असतील. या योजने फक्त 500 रुपये मासिक जमा करून SIP गुंतवणूक सुरू करता येते.

Axis Bluechip Fund :
अॅक्सिस ब्लूचिप फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 22.52 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेत ज्या लोकांनी 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली होती,त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 2.76 लाख रुपये झाले आहे. त्याच वेळी, ज्या लोकांनी या योजनेत 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक सुरू केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 10.70 लाख रुपये झाले असतील. या योजने 500 रुपये मासिक जमा करून SIP गुंतवणूक सुरू करता येते.

Axis Long Term Equity Fund :
अॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंडामध्ये ज्या लोकांनी गुंतवणूक केली होती, त्यांनी मागील 5 वर्षांत 21.75 टक्के वार्षिक परतावा कमावला आहे. जर तुम्ही या योजनेत 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली असती, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.68 लाख रुपये असते. त्याच वेळी, जर तुम्ही या म्युचुअल फंड योजनेत 10,000 मासिक SIP गुंतवणूक केली असती, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10.73 लाख रुपये झाले असते. या योजनेत तुम्ही 500 रुपये मासिक जमा करून SIP गुंतवणूक सुरू करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Top 5 Axis Mutual fund Scheme giving huge returns to investors in five years 1 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x