23 November 2024 7:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Credit Card| क्रेडिट कार्डच्या कर्जातून मुक्त व्ह्यायचे? टॉप अप सुविधा म्हणजे काय? जाणून घ्या क्रेडिट कार्डचा योग्य वापर आणि कर्ज परतफेड कशी करावी

Credit card

Credit Card| सध्या आपले सणासुदीचे दिवस चालू आहे. दुर्गापूजा,दसरा, दिवाळी, या सणांच्या निमित्ताने बाजारात खरेदीसाठी वर्दळ सुरू होते. आपल्या इथे दिवाळी आणि धनत्रयोदशी च्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. बाजारात एकापेक्षा एक डिस्काउंट आणि ऑफर पाहून आपल्याला खरेदीचा मोह आवरत नाही. पण या लोभापायी आपण अनेकदा गरजेपेक्षा जास्त खर्च करतल, आणि गरज नेसलेल्या वस्तूही विकत घेतो. अश्या वेळी आपण क्रेडिट कार्डचा ही अनावश्यक वापर करतो. आणि त्यामुळे आपल्यावर मोठी बिले आणि थकबाकी भरण्याचा दबाव वाढू लागतो. सुरुवातीला क्रेडिट कार्ड वापरणे आणि खर्च करणे फार मजेशीर वाटते. पण जेव्हा क्रेडिट कार्ड चे बिल येते, तेव्हा आपल्याला आपली चूक लक्षात येते.

क्रेडिट कार्ड बिल आणि कर्ज भरणार कसे?
आपण क्रेडिट कार्ड चा वापर करतो, तर त्यावर आपल्याला क्रेडिट कार्ड कंपनी किंवा बँक शुल्क आकारत असते. हे शुल्क भरण्यासाठी बँका तुम्हाला आकर्षक ऑफर्स ही देतात. तुम्हाला क्रेडिट कार्ड पेमेंटवर इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट म्हणजेच EMI चा पर्यायही दिला जाईल. याशिवाय, तुम्ही थोडी रक्कम सुरुवातीला देऊ उरलेले पैसे हप्ते रूपाने ही भरू शकता. तथापि, हे दोन्हीही पर्याय चांगले नाहीत. मग तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड करणार कशी? विशेषत: अशा वेळी जेव्हा आर्थिक मंदीचे सावट जगावर असेल, बेरोजगारी वाढत असेल, लोकांना नोकरी गमवावी लागत असते, पगार कपात होत असेल, तेव्हा हे कर्ज फेडणे तुमच्यासाठी खूप अवघड होऊ शकते.

कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉइंट :
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या खरेदीवर कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉइंट दिले जातात. तुम्ही हे पॉइंट खरेदी करताना रिडिम करु शकता. तुमच्या क्रेडिट कार्ड जारी करणार्‍या बँकेने तुमचे बिल जनरेट केले नसेल तर तुम्ही तुमचे रिवॉर्ड पॉइंट रिडीम करू शकता. काही बँका किंवा क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्हाला तुमचे रिवॉर्ड पॉइंट्स तुमचे क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठीही वापरू देतात. जर तुमचे क्रेडिट कार्ड बिल जनरेट झाले असेल तर तुम्ही केलेली कोणतीही खरेदी पुढील बिलिंग सायकलमध्ये जोडून येईल. यातून मिळणारा दिलासा मिळण्यास थोडा आणखी वेळ लागेल.

क्रेडिट कार्ड EMI :
Credit Card EMI हा क्रेडिट कार्डचे बिल भरण्याचा एक सोपा आणि सर्वात सोयीस्कर पर्याय आहे. Credit Card EMI वर 15 ते 22 टक्के व्याज शुल्क आकारले जाते. तसेच, हे उच्च प्रीपेमेंट खर्चासारख्या गोष्टींसह येते. तुम्ही तुमचे सर्वात कमी व्याज असलेले कर्ज आणि सर्वात जास्त व्याजमुक्त कालावधीचे थकबाकी कर्ज परतफेड करण्यासाठी क्रेडिट कार्डवर हस्तांतरित करू शकता, हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीला कॉल करून तुमची क्रेडिट कार्ड ची देय रक्कम EMI मध्ये रूपांतरित करू शकता, आणि सुलभ हप्त्यात परतफेड करू शकता.

टॉप-अप कर्ज :
क्रेडिट कार्ड घेण्याचे काही फायदेही आहेत. याचा वापर करून तुम्ही तुमच्या सध्याच्या गृहकर्जावर टॉप-अप देखील घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला कर्जाची परतफेड सुलभ पणे करता येईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही 1 लाख रुपयांचे टॉप-अप कर्ज घेतले आणि त्याचा कालावधी 15 वर्ष ठेवला असेल, तर 7.5 टक्के इतके कमी व्याज असले तरीही तुम्हाला सुमारे 70,000 रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. अशा परिस्थितीत या टॉप-अपची योग्य प्रकारे लवकरात लवकर परतफेड करणे आवश्यक आहे. तुम्ही दर महिन्याला काही पैसे बाजूला ठेवून वर्षभरात टॉप-अपची संपूर्ण रक्कम फेडू शकता, असे केल्याने तुम्हाला कमी व्याज द्यावा लागेल. परंतु, हे टॉप अप कर्ज फक्त त्यांना घेता येते जे आधीच गृहकर्जावर EMI भरत आहेत.

गुंतवणुकीसाठी टॉप अप कर्ज :
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्ही मुदत ठेवी, म्युच्युअल फंड, जीवन विमा पॉलिसी आणि अगदी सोने खरेदीसाठी ही टॉप-अप कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज उचलू शकता. हे तुमचे व्याज खर्च कमी करण्यास मदत करेल. अश्या प्रकारचे कर्जे साधारणतः एका वर्षाच्या ओव्हरड्राफ्ट स्वरूपात घेता येतात. बँका द्वारे हे कर्ज जलद आणि डिजीटल रूपाने घेता येते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Credit card use and payment system with Top Up loan facility benefits on 03 October 2022.

हॅशटॅग्स

#Credit Card(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x