23 November 2024 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Penny Stocks | या 14 रुपयाच्या पेनी शेअरने तिजोरी पैशाने भरली, 2200 टक्के परतावा दिला, पुढे अजूनही नफा, स्टॉक नेम नोट करा

Penny Stocks

Penny Stocks | शेअर बाजारात गेल्या दोन आठवड्यापासून विक्रीचा दबाव वाढला आहे. जागतिक अस्थिरता, आर्थिक मंदी, रुपयाचे घटत चाललेले मूल्य, हे भारतीय शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम करताना दिसून येत आहेत. अश्या वेळी भारतीय शेअर बाजारात असे काही स्टॉक आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून देत आहेत. Lancer Container Lines Ltd/लान्सर कंटेनर लाइन्स लिमिटेड हा अश्याच स्टॉकपैकी एक आहे ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना कडक परतावा मिळवून दिला आहे. गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्या या कंपनीवर विदेशी गुंतवणूकदारानीही भरघोस पैसे लावले आहेत. यामुळेच परदेशी गुंतवणूकदारांनी या कंपनीतील आपली गुंतवणूक दुप्पट वाढवली आहे. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीच्या कामगिरीबद्दल सविस्तर.

मागील एका महिन्यात Lancer Container Lines Ltd कंपनीचे शेअर 20 टक्क्यांनी वर गेले आहेत. एक महिन्यापूर्वी हा स्टॉक 268 रुपयांवर ट्रेड करत होता, त्यात कमालीची वाढ होऊन स्टॉक सध्या 323 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 6 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी ह्या स्टॉक मध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 95 टक्क्यांपर्यंत गेले आहेत. सहा महिन्यांपूर्वी एका शेअरची किंमत 164 रुपये होती, त्यात जबरदस्त वाढ होऊन आता शेअर 323 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2022 या चालू वर्षात अनेक कंपन्यांच्या शेअरनी निराशादायक कामगिरीत केली आहे. इतर स्टॉकच्या तुलनेत या कंपनीच्या शेअर्समध्ये 80 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी लॅन्सरच्या स्टॉकवर पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्या 180 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. 5 वर्षांपूर्वी या कंपनीचा एक शेअर फक्त 14 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात कमालीची वाढ झाली असून स्टॉक सध्या 323 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या कंपनीच्या शेअर नी आपल्या गुंतवणूकदारांना 5 वर्षात 2200 टक्के परतावा कमावून दिला आहे.

परकीय गुंतवणूकदरांचा विश्वास :
परकीय गुंतवणूकदारानी या स्टॉकमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. एप्रिल ते जून 2022 पर्यंत परकीय गुंतवणूकदारांचा गुंतवणूक वाटा 6.63 टक्के होता, त्यात वाढ होऊन आता परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक 13.60 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत परकीय गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक दुप्पट प्रमाणात वाढवली आहे. परकीय गुंतवणूकदारांपैकी एक Elara India Opportunities Fund ने आपली गुंतवणूक वाढवली, आणि सध्या त्यांचा Lancer Container Lines मध्ये 1.67 टक्के वाटा आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Lancer Container Lines Ltd share price return on investment on 04 October 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x