22 November 2024 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

VIDEO | शिंदे गटाच्या टीझरमधील 'एक नाथ' गर्दीतील एकालाही माहिती नाही, सत्तारांच्या गर्दीतील लोकांच्या तोंडी उद्धव ठाकरेंचं नाव

Video Viral

CM Eknath Shinde | शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मोठी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे हे आता शिवसेनाही काबीज करतील अशी शक्यता आहे. त्यामुळेच यंदा पहिल्यांदाच मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. पहिला मेळावा आहे तो उद्धव ठाकरेंचा जो शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजीपार्क मैदानावर होणार आहे. तर दुसरा मेळावा आहे तो एकनाथ शिंदे यांचा. जो बीकेसी मैदानावर होणार आहे. एकाबाजूला निष्ठावान शिवसैनिक खिशातून पैसे टाकून येत आहेत आणि अशात फ्लोरिडामधला एक कट्टर शिवसैनिक दसरा मेळाव्याला उपस्थित झाला आहे. ८० हजारांचं तिकिट काढून अक्षय राणे मुंबईत आला आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या १८०० बसेस बूक करण्यासाठी शिंदे गटाकडून १० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने दिलं आहे. दसरा मेळाव्याच्या माहिती देताना दीपक केसरकर म्हणाले, दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवायची नसते, ती आपोआप होत असते. जो जो महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक आहे, त्यांना असं वाटतंय की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाला आहे. त्यामुळे असंख्य लोक मेळाव्याला येऊ इच्छित आहेत.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “विश्वास महत्त्वाचा असतो, त्याला तडा जाता कामा नये. मला तर चिंता वाटत असून दौंड मधूनच मोदी साहेबांना फोन लावावा आणि ही 10 कोटीची रोकड कुठून आली अशी विचारणा करावी असं वाटतंय. याची चौकशी लावा असं सांगावं तर ते म्हणतील, आम्ही हे दहा कोटी रोकड राज्यातून जमा केली.

हे सर्व असताना आता एकदिवस आधी शिंदे गट आणि एकनाथ शिंदे यांच्या नैत्रुत्वाचं वास्तव येण्यास सुरुवात झाली आहे. २ दिवसांपासून शिंदे गट स्वतःच्या मेळाव्याच्या प्रमोशनसाठी टिझर वर टिझर समाज माध्यमांवर व्हायरल करत आहे. त्यातील एक पोश्टरवर ‘एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ’ याचं देखील प्रमोशन करण्यात आलं होतं. मात्र त्याच पोश्टरमधील ‘एक नाथ’ म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना औरंगाबाद येथून बीकेसीत येणाऱ्या लोंकांमधील एकही व्यक्ती ओळखत नसल्याचं पाहायला मिळतंय. अनेकांनी तुम्ही कुठे आणि कोणाचं भाषण ऐकायला जातं आहात यावर एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यावर म्हटलं की, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि सत्तार शेट. पण येणाऱ्या गर्दीतील लोकांना एकनाथ शिंदे कोण हेच माहिती नाही. त्यामुळे यापूर्वी सुद्धा शिंदें समर्थकांमार्फत एकनाथ शिंदे यांनी अशीच गर्दी जमवून स्वतःच्या दौऱ्यात मार्केटिंग केल्याचं म्हटलं जातंय. कारण तेच शिंदेंच्या दौऱ्यातील निरनिराळे व्हिडिओ सध्या वेगवेगळ्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शिंदे स्वतःच नैतृत्व लोकांवर जबरदस्ती लादत असल्याचं सिद्ध होतंय.

काय आहे नेमका व्हिडिओ पहा : Video Courtesy ABP Majha

News Title: Video of peoples coming from Aurangabad to BKC check details 05 October 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x