'राजकीय असंतुष्ट' आणि 'ठाकरेंच्या कौटुंबिक असंतुष्टांची' युती, पण बाळासाहेब ठाकरे जयदेव ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते जाणून घ्या
CM Eknath Shinde | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांचे दर्शन झाले. जयदेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्टेज शेअर केला. यावेळी जयदेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दर्शवत एकनाथ शिंदे यांना एकटे सोडू नका, ते शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
शिंदे गटाने मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. शहरात प्रथमच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने पारंपरिक ठिकाण असलेल्या शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. दरम्यान. बीकेसीत पूर्वनियोजितपणे ‘राजकीय असंतुष्ट’ आणि ‘ठाकरेंच्या कौटुंबिक असंतुष्टांची’ युती झाल्याचं पाहायला मिळलं. मात्र वास्तव वेगळं आहे, केवळ शिंदेंनी स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केल्याचं पत्रकार सुद्धा बोलत आहेत आणि हा प्रयोग पूर्णपणे फसला आहे. पण काय म्हणाले होते बाळासाहेब ठाकरे जयदेव ठाकरेंबद्दल जाणून घ्या
आपल्या धारदार भाषणांनी सार्वजनिक जीवनात ठसा उमटविणारे बाळासाहेब ठाकरे वैयक्तिक आयुष्यात मुलांना अत्यंत गोड वागणूक देण्याचे पुरस्कर्ते होते. मुलांना शिस्त लावण्यासाठी त्यांना मारहाण करण्याच्या ते पूर्णपणे विरोधात होते. त्यांनी स्वत: आपल्या मुलांशी चांगले संबंध ठेवण्याचा कायम प्रयत्न केला. बाळासाहेबांना तीन मुले होती – थोरले बिंदू माधव (१९९६ मध्ये अपघातात निधन), जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे.
बाळासाहेबांना जयदेव कधीच पटले नाही कारण.. :
बाळासाहेब आणि जयदेव यांच्या नात्यात १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला दुरावा येऊ लागला. जयदेव यांचा पहिला विवाह जयश्री कालेलकर यांच्याशी झाला. जयदेव ठाकरे त्या लग्नामुळे खूश नव्हते. कुटुंबात तणावाची परिस्थिती होती. त्याचवेळी जयदेव ठाकरे यांनी मोठे पाऊल उचलले आणि ते त्यांच्या पत्नी जयश्रीपासून वेगळे झाले. बाळासाहेब आणि जयदेव यांचे नाते या वेगळेपणामुळे जवळपास आयुष्यभर बिघडले. जयदेवठाकरे यांनी आपली दुसरी पत्नी स्मिता ठाकरे यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही कटुता आणखीनच वाढली. जयदेव ठाकरे यांनी काही वर्षांतच स्मितापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 1995 मध्ये बाळ ठाकरे यांच्या पत्नी मीना ठाकरे यांचं निधन झालं आणि पिता-पुत्रांचं नातं आणखी दुरावलं. जयदेव ठाकरेंनी आपल्या घरी जाणे बंद केले. जयदेव यांनी तिसरं लग्न केलं आहे. तिसऱ्या पत्नीचे नाव अनुराधा आहे.
मोठ्या आणि धाकट्या मुलाशी बाळासाहेबांचे संबंध चांगले :
मात्र मोठ्या आणि धाकट्या मुलाशी बाळासाहेबांचे संबंध चांगले होते, पण जयदेव ठाकरे यांच्याबाबतीत कायम कटुता होती. २०१२ मध्ये बाळासाहेबांचे निधन झाले, पण त्याआधी जवळपास दोन दशके जयदेव यांच्याशी त्यांचे संबंध कधीच सलोख्याचे नव्हते. बाळासाहेब जयदेवांना इतके कंटाळले होते की, त्यांनी एकदा सामनामध्ये लिहिले होते – तो मुलगा म्हणजे त्रासदायक आहे.
बाळासाहेबांचा वारसा :
बाळासाहेब ठाकरे यांचे २०१२ मध्ये निधन झाले. त्यांनी आपल्या इच्छेखातर जयदेव ठाकरेंना काहीही दिलं नाही. मात्र, त्यांनी संपत्तीचा काही भाग सून स्मिता आणि नातू ऐश्वर्या यांच्या नावावर सोडून दिला. बाळ ठाकरे यांची मानसिक स्थिती मृत्यूपूर्वी बरी नसल्याचा आरोप जयदेव यांनी केला होता. याबाबत कोर्टात केसही झाली होती, तिथे जयदेव यांनी अजब दावा केला होता. मुलगा ऐश्वर्याबद्दल त्यानी कोर्टात दावा केला होता की, तो माझा मुलगा नाही. कोर्टात त्यांनी उद्धव ठाकरेंवरही आरोप केले होते.
जयदेव ठाकरे यांना राजकारणात रस नव्हता :
जयदेव ठाकरे यांनी एकदा स्वत:बद्दल सांगितलं होतं की, त्यांना राजकारणात रस नाही. मी घाणेरड्या राजकारणापेक्षा घाणेरडी चित्रपट जास्त पसंत करेन, असं ते म्हणाले होते. मात्र वडिलांसोबतच्या नात्यावर त्यांनी बाळ ठाकरे यांना मलाच राजकीय वारस बनवायचं असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे कालच्या बीकेसीतील त्यांच्या हजेरीने त्यांचं वाक्यच सिद्ध झालं आणि ते म्हणजे “मी घाणेरड्या राजकारणापेक्षा घाणेरडी चित्रपट जास्त पसंत करेन’ असं म्हणायला हवं.
कोण आहेत स्मिता ठाकरे?
जयदेव ठाकरे यांच्या दुसऱ्या पत्नी स्मिता ठाकरे यांना बाळ ठाकरे यांनी त्यांच्या संपत्तीत वाटा दिला होता. बाळ ठाकरे यांचे जयदेव यांच्याशी संबंध बिघडले असले तरी स्मिता ठाकरे यांनी कुटुंबीयांशी संबंध बिघडले नाहीत. स्मिता ही सामाजिक कार्यकर्ती आणि चित्रपट निर्माती म्हणूनही काम केले आहे. राहुल प्रॉडक्शन आणि मुक्ती फाऊंडेशनच्या त्या अध्यक्ष आहेत. महिलांच्या सुरक्षेव्यतिरिक्त एचआयव्ही जनजागृतीचं काम त्या करतात. २०१९ मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात संजय दत्त आणि गोविंदा यांनी अभिनय केला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Jaydev Thackeray meet CM Eknath Thackeray at BKC Rally check details 06 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News