22 November 2024 6:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Multibagger Stocks | मागील दसऱ्याला या 44 शेअर्समध्ये लोकांनी पैसे गुंतवले, या दसऱ्याला मल्टिबॅगर परतावा मिळाला, स्टॉकची यादी सेव्ह करा

Multibagger stock

Multibagger Stocks | असे म्हंटले जाते की शेअर बाजारात गुंतवणूक करावी तर, दीर्घकाळ ठेवावी अन्यथा गुंतवणूक करू नये. काही स्टॉक अल्प काळात चांगला परतावा देतात तर, काही स्टॉक सहा महिने किंवा एक वर्षात पैसे दुप्पट करतात. मागील एका वर्षात किमान 44 स्मॉलकॅप स्टॉक असे आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. अस्थिर जागतिक आर्थिक वातावरण, आर्थिक मंदी आणि वाढते व्याजदर या सर्व चिंतेमुळे मागील काही महिन्यात Sensex 6 टक्के पेक्षा अधिक पडला आहे. अशा पडझडीच्या काळातही हे स्मॉल कॅप स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा नफा कमावून देत आहेत.

आज आपण स्मॉल कॅप कंपनीची माहिती घेणार आहोत ज्यांचे बाजार भांडवल 1,400 कोटी रुपये पेक्षा कमी आहे, परंतु या स्टॉकनी आपल्या भागधारकांना अप्रतिम नफा दिला आहे. Cressanda solution या कंपनीचा शेअर मागील एक वर्षापासून स्मॉल कॅप स्टॉक कंपनीच्या यादीत परतावा देण्याबाबत अव्वल स्थानावर आहे. गेल्या एका वर्षात ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 1,500 टक्के पेक्षा अधिक बंपर परतावा कमावून दिला आहे. एक वर्ष पूर्वी या शेअर्स ची किंमत फक्त 2 रुपये होती, जी सध्या वाढून 34 रुपयांवर गेली आहे.

स्मॉल कॅप स्टॉकचा परतावा :
स्मॉल कॅप स्टॉक मध्ये गुंतवणूक करणे थोडे जोखमीचे असते, पण जेव्हा हे स्टॉक वाढतात तेव्हा गुंतवणूकदारांना श्रीमंतीच करून सोडतात. KPI ग्रीन एनर्जी हा स्मॉलकॅप कंपनीचा शेअर मागील एका वर्षात आउटपरफॉर्मर राहिला आहे. KPI Green Energy मध्ये 500 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज, मिर्झा इंटरनॅशनल आणि ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अश्या काही इतर स्मॉल कॅप कंपन्यांनी तर 375 ते 424 टक्के पर्यंत वाढ नोंदवली आहे. Choice International, Sadhana Nitro Chem, Finotex Chemical, DB Realty, Lloyds Steels Industries, Shoppers Stop, Rajaratan Global Wire आणि TGV SRACC हे स्मॉल कॅप स्टॉक अप्रतिम परतावा देण्यात अव्वल राहिले आहेत.

बंपर परतावा देणाऱ्या स्मॉल कॅप स्टॉकची यादी : 

शिवालिक बिमेटल कंट्रोल : 160.27 टक्के
विष्णू केमिकल्स : 154.67 टक्के
अरिहंत कॅपिटल मार्केट्स : 150 टक्के
वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज : 143.39 टक्के
जगसनपाल फार्मास्युटिकल्स : 134.54 टक्के
मोनार्क नेटवर्थ कॅपिटल : 133.22 टक्के
BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस : 132.76 टक्के
वाडीलाल इंडस्ट्रीज : 130.61 टक्के
रेमंड : 130.26 टक्के
पंजाब अल्कली अँड केमिकल : 128.5 टक्के
राधे डेव्हलपर्स : 128.41 टक्के

तोट्यात असलेल्या स्मॉलकॅप कंपन्यांबद्दल थोडक्यात :
फ्युचर रिटेल या स्मॉल कॅप कंपनीचा शेअर मागील एका वर्षात 93 टक्के पडला आहे. फ्युचर कन्स्युमर या फ्युचर ग्रुप मधील आणखी एक कंपनीचा स्टॉक 76 टक्के पडला आहे. इतर सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्यां स्मॉल कॅप स्टॉकमध्ये गायत्री प्रोजेक्ट्स, फ्युचर लाइफस्टाइल फॅशन आणि KBC ग्लोबल यां कंपनीचा समावेश होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Small Cap stocks list for return on investment on 06 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x