23 November 2024 8:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Multibagger Stocks | या शेअरने 21 दिवसांत 103 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला, पैसा वेगाने वाढवायचा असेल तर स्टॉक खरेदीचा विचार करा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | मागील काही महिन्यांपासून शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसून येत आहे. जागतिक आर्थिक मंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भीतीचे वातावरण पसरले आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे मागणी आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कारोना मुळे आधीच जागतिक अर्थव्यवस्था कमजोर झाली होती. अश्या वेळी स्टॉक मार्केट मध्ये ह्याचे विपरीत परिणाम तर दिसून येणारच.

गेल्या एक महिन्यापासून आपण शेअर बाजार लाल निशाणी वर ट्रेड होताना पहिला आहे. एकीकडे शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढत आहे, तर दुसरीकडे असे काही स्टॉक आहेत, जे आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देत आहेत. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, “Liberty Shoes”. ही एक फुटवेअर कंपनी आहे. Liberty Shoes कंपनीने सप्टेंबर 2022 मध्ये आपली सर्वकालीन विक्रमी किंमत स्पर्श केली होती. तेव्हापासून आतापर्यंत हा स्टॉक दररोज एक नवीन उचांक निर्माण करत आहे.

एका महिन्यात दुप्पट परतावा :
भारतीय शेअर बाजार एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहे, ज्यात बाजारातील पडझडीचे कारण देशांतर्गत नसून आंतरराष्ट्रीय अस्थिरता आहे. मागील एका महिन्यात S&P BSE Sensex मधे 1.7 टक्क्यांची घसरण दिसून आली, त्या तुलनेत मागील एका महिन्यात Liberty Shoes या फुटवेअर कंपनीच्या शेअरची किंमत दुपटीपेक्षा अधिक म्हणजेच 104 टक्क्यांनी वाढली आहे. ज्या लोकांनी एका महिन्यापूर्वी ह्या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली होती, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 104 टक्के वाढले असणार. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या फूटवेअर स्टॉकमध्ये 30 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी वार्षिक दर वाढ प्रमाणे ह्या स्टॉकमध्ये 118.99 टक्के वाढ नोंदवण्यात आली होती.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
लिबर्टी शूज कंपनी सध्या दररोज 50,000 हून अधिक शूजचे उत्पादन करते. ही कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दहा वेगवेगळे शूज ब्रँड बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. Leap 7X, Healer, Lucy & Luke आणि AHA हे कंपनीच्या लिबर्टी शूज कंपनीच्या मालकीचे ब्रँड आहेत. ह्या ब्रांड्स ची भारतीय तसेज जागतिक बाजारात भरपुर मागणी आहे. कंपनीच्या एकूण विक्रीपैकी ब्रँड विक्रीचा वाटा मोठा आहे. 2022-23 मध्ये कंपनी आपल्या ब्रँड विक्रीत 30 टक्के वाढ करण्याचे प्रयत्न करेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Liberty Shoes limited share price return on investment on 06 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x