22 December 2024 5:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

शिंदेंच्या भाषणावेळी डुलक्या काढणारे केसरकर म्हणाले 'ठाकरेंच्या भाषणातील वक्तव्याने मी अस्वस्थ, रात्री झोप लागत नाही

Deepak Kesarkar

Minister Deepak Kesarkar | महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आज पुण्यात होते. यावेळी बोलताना दीपक केसरकर म्हणाले, उद्वव ठाकरेंच्या भाषणातील वक्तव्यांमुळे मी अस्वस्थ झालो. डुक्कर ही भाषा संजय राऊतांच्या तोंडी शोभते. उद्वव साहेबांच्या तोंडी शोभत नाही. एकनाथ शिंदेंचा मला अभिमान आहे. त्यांच्याबद्दल उद्वव ठाकरे जे बोलले, त्यामुळे मी अस्वस्थ आहे. मला रात्री झोप लागत नाही. त्यासाठी मी शिर्डीला जाऊन दर्शन घेऊन मन शांत करुन आलो, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं.

दसरा मेळाव्यात झोपलो नव्हतो :
दसरा मेळाव्यानंतर माझ्याबाबत उद्धव ठाकरे काहीही बोलले तरीही मी काहीही उत्तर देणार नाही, असं मी ठरवलं होतं. मात्र त्यांच्या भाषणात आमच्या आमदारांबाबत आणि सरकारबाबात काहीही टीका केली गेली. त्या मुद्द्याबाबत शिंदे गटाचा मुख्य प्रवक्ता म्हणून देईल. त्यात उद्धव ठाकरेंना कमी लेखण्याची माझी कोणतीही भूमिका नाही. दसरा मेळाव्यात झोपलो नव्हतो, मी विचार करत होतो मी झोपलो असतो तर माझे हात हलले नसते, असं स्पष्टीकरण देखील त्यांनी टीकेवर दिलं आहे.

केसरकर म्हणाले की, माझ्यात शरीरात एका बापाचे ह्रदय देखील आहे. त्यामुळे मी कोणत्याच विद्यार्थ्यांचं किंवा शिक्षकाचं नुकसान होऊ देणार नाही. पोलिसांच्या चौकशीत जे शिक्षक दोषी ठरले आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल. त्यांना वगळून परीक्षेचा निकाल येत्या काहीच दिवसात जाहीर केला जाईल. मात्र ज्या शिक्षकांनी प्रामाणिकपणे ही परीक्षा दिली आहे त्यांनाही योग्य न्याय मिळेल, असंही ते म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Minister Deepak Kesarkar talked on Uddhav Thackeray check details 07 October 2022.

हॅशटॅग्स

#Deepak Kesarkar(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x