22 November 2024 7:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतील महागाई-बेरोजगारीच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करत फडणवीसांकडून सोयीस्कर मुद्दा उचलत उद्धव ठाकरेंना सवाल

Devendra Fadnavis

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेला एक महिना पूर्ण झाल्यानंतर राहुल गांधी यांनी शनिवारी कर्नाटकच्या तुरुवेकरमध्ये 34 मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल यांनी सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पीएफआयच्या अंतर्गत राजकारणाबद्दल काँग्रेसशी चर्चा केली. देशातील जनता भ्रष्टाचाराने त्रस्त असून ती सांभाळण्यासाठी सरकार माध्यमांवर नियंत्रण ठेवत आहे, असे काँग्रेस खासदार म्हणाले.

भारताच्या फाळणीबाबत विचारलेल्या प्रश्नावर राहुल म्हणाले, ‘सावरकर स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांसाठी काम करायचे आणि त्यासाठी त्यांना पैसा मिळायचा. राहुल पुढे म्हणाले- राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ब्रिटीश राजला पाठिंबा दिला होता आणि आज त्यांच्या द्वेषाविरोधात भारत जोडो यात्रा काढली जात आहे.

व्यावसायिकाच्या विरोधात नाही, मक्तेदारीच्या विरोधात :
यानंतर अदानी समूहाने राजस्थानमध्ये गुंतवणूक केल्याच्या प्रश्नावरही राहुल यांनी भाष्य केलं. ‘मी कॉर्पोरेट्सच्या विरोधात नाही. मी मक्तेदारीच्या विरोधात आहे. राजस्थानमधील प्रक्रियेनुसार तिथे सर्व काही ठीक आहे. सरकारने कोणतीही वीज वापरून तेथील अदानींना फायदा करून दिलेला नाही. जर, कधीही, फायदा दिला गेला तर मी प्रथम निषेध करेन. दरम्यान, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत महागाई आणि बेरोजगारीवर सर्वाधिक भर दिला आहे. मात्र महाराष्ट्रात त्या अडचणीच्या विषयांना बगल देत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयीस्कर मुद्द्यांवरून शिवसेनेला प्रतिप्रश्न केला आहे.

राहुल गांधींनी केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंना प्रतिप्रश्न केले आहेत. यावेळी ते म्हणाले, “काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलाय. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ते इंग्रजांचे हस्तक होते. ते इंग्रजांकडून पैसे घेत होते, अशा अनेक गोष्टी ते सावरकरांबद्दल बोलत आहेत”, असं त्यांनी सांगितलं.

“खरं म्हणजे राहुल गांधींचा मी निषेध करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांना काँग्रेसनं यामुळे वारंवार अपमानित केलं, कारण सावरकरांच्या पाठिमागे मोठ्या प्रमाणात भारतातली जनता होती. स्वातंत्र्यानंतर जी राजकीय परिस्थिती होती, त्या परिस्थितीत जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपमानित करण्याचं काम काँग्रेसनं केलंय”, असा आरोप फडणवीसांनी केला.

उद्धव ठाकरेंना उद्देशून काय म्हणाले?
“स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी करतात, कारण राहुल गांधींना भारताचा इतिहासच माहिती नाही. त्यांना काँग्रेसचा इतिहास माहिती नाहीये. आम्ही त्यांचा निषेध करतो. माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा ते निषेध करणार आहेत की नाही. ही जी कुठली भारत जोडो की तोडो यात्रा त्यांनी सुरू केलीये. या यात्रेच्या स्वागतासाठी ते शिवसेनेचे नेते पाठवणार आहेत का आणि पाठवून राहुल गांधींनी जे विधान केलंय, त्याचं समर्थन ते करणार आहेत का याचं उत्तर आता कुठेतरी उद्धजींनी दिलं पाहिजे”, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना भूमिका मांडण्याचं आवाहन केलंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: DCM Devendra Fadnavis press conference after Rahul Gandhi statement check details 08 October 2022.

हॅशटॅग्स

#DCM Devendra Fadnavis(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x