6 November 2024 4:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपुरता शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हं गोठवलं, पक्षाच्या नावानेही निवडणूक लढता येणार नाही

Shivsena

Shivsena Party Symbol | केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होईल, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटाला निवडणूक आयोगाला पर्याय द्यायचे आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा करण्यात आला असल्याने पुढील आदेशापर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्य-बाण हे पक्षचिन्ह गोठवलं आहे. तसेच दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही, असे आदेश आयोगाने दिले आहेत. शनिवारी रात्री उशीरा आयोगाने याबाबतचे आदेश जारी केले.

यासोबतच अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना तात्पुरत्या स्वरुपात नवीन नाव, नवीन चिन्ह या गोष्टींची माहिती १० ऑक्टोबरपर्यंत आयोगाला कळविणास सांगितले आहे. दोन्ही गटांना नावाचे आणि मुक्त चिन्हामधील चिन्हांचे आपल्या आवडीनुसार आणि प्राथमिकतेनुसार तीन पर्याय १० ऑक्टोबर पर्यंत देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. यानंतर आयोगाकडून दोन्ही गटांना नवीन नाव आणि चिन्ह देण्यात येणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Party Symbol freezes Election by Commission check details 08 October 2022.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x