19 April 2025 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Investment Options | तुमच्याकडील पैसा वेगाने वाढवायचा असेल तर या निरनिराळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवा, पर्याय नोट करा

Investment Options

Investment Options | 2022 या वर्षात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांची फार मोठी निराशा केली आहे. या चालू वर्षात इक्विटी, सोने, क्रिप्टोकरन्सी या सर्व गुंतवणूक बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. जगातील विकसित देशांच्या मध्यवर्ती बँकांनी वेळोवेळी व्याजदर वाढवले, आणि त्यामुळे गुंतवणूक बाजारात कमालीची अस्थिरता निर्माण झाली. रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आणि मागणी-पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम झाला. इतक्या कमालीच्या घसरणीनंतर, भारतातील प्रमुख बेंचमार्क निर्देशांकात पुन्हा तेजी पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारात सुरू असलेल्या गोंधळाच्या काळात, गुंतवणूकदारांनी इक्विटीमध्ये पैसे लावावे लांब राहावे, की इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करावा, याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू.

शेअर बाजारात गुंतवणुक करण्यासाठी आर्थिक नियोजन करणे खूप आवश्यक आहे. सर्व गुंतवणूकदारांनी नेहमी आपल्या आर्थिक उद्दिष्टांच्या अनुषंगाने आपली जोखीम क्षमता ठरवली पाहिजे. उदाहरणार्थ, 5 वर्षे किंवा त्याहून अधिक आर्थिक उद्दिष्टे असलेल्या लोकांनी इक्विटी किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे योग्य राहील. कारण इथे दीर्घकाळात तुमचे पैसे अधिक पटीत वाढण्याची शक्यता असते. छोट्या गुंतवणूकदारांनी इक्विटी मार्केटपासून गोंधळाच्या काळात दूरच राहिले पाहिजे.

इक्विटी मार्केटमधील गुंतवणूक :
जागतिक अस्थिरता, गोंधळ, आणि तिसऱ्या विश्व युद्धाची शक्यता असूनही, दीर्घ मुदतीसाठी इक्विटी मार्केट हा गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय आहे. एकूणच, 2022 हा वर्ष गुंतवणूकदारांसाठी अतिशय नुकसानकारक होता. जागतिक भौगोलिक-राजकीय कारणांमुळे, स्टॉक बाजार अस्थिर आणि बिथरलेला दिसला. सध्या परिस्तिथी विचारात घेता गुंतवणूकदारांनी 40 ते 50 टक्के रक्कम इक्विटी मार्केटमध्ये गुंतणूक करण्यास हरकत नाही. ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे.

म्युच्युअल फंड, सोने आणि मुदत ठेव :
मुदत ठेवी आणि सरकारी रोखे काही वर्षात 6-7 टक्के परतावा मिळवून देतात, तर सोने सपाट राहू शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे. या अस्थिर आणि बाजारातील गोंधळाच्या परिस्थितीत SIP द्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे राहील. म्युचुअल फंडांतून 20-25 टक्के परतावा मिळू शकतो. हे गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीसाठी रुपयाची सरासरी योजना बनवण्यात अधिक लवचिकता देईल.

इक्विटी म्युच्युअल फंड :
इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी SIP वापरणाऱ्या गुंतवणूकदारांनी नियमित न बुडवता एसआयपी चालू ठेवणे फायद्याचे आहे. SIP दीर्घकाळ नियमित चालू राहिल्याने त्यांना कमी NAV वर अधिक इक्विटी फंड युनिट्स खरेदी करण्याचा लाभ होऊ शकतो. यामुळे गुंतवणूकदारांचा सरासरी खर्च कमी होईल आणि त्यांची आर्थिक उद्दिष्टे अल्पावधीत साध्य होण्यास मदत होईल.

Gold ETF/गोल्ड ईटीएफ :
गुंतवणुकदार शेअर बाजाराच्या पडझडीच्या काळात सार्वभौम गोल्ड बाँडद्वारे सोन्यात गुंतवणूक करू शकता. तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, जेव्हा गुंतवणूक म्हणून सोन्याचा विचार केला जातो तेव्हा गुंतवणूकदारांनी दीर्घ कालावधीसाठी एकूण गुंतवणूक रकमेतून 20-25 टक्केच गुंतवणूक करावी.

Bank FD/बँक एफडी :
मुदत ठेव योजना भारतातील सर्वात सुरक्षित आणि हमखास परतावा देणाऱ्या गुंतवणुक पर्यायांपैकी एक मानली जाते. परंतु तज्ञ म्हणतात की उच्च चलनवाढीच्या काळात मुदत ठेव योजना फक्त 5-6 टक्के परतावा देऊ शकतात. मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणे सध्याच्या काळात टाळावे. मुदत ठेव योजनेत गुंतवणुक करण्याऐवजी, गुंतवणूकदार कमी जोखमीच्या इतर गुंतवणुकीवर 8-9 टक्के परतावा मिळवू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment Options for Long term investment opportunities and huge returns on 10 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Investment Options(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या