18 April 2025 9:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Viral Video | बॉलिवूडच्या धक धक गर्ल सोबत सोशल मीडिया स्टार किली पॉलने लावले ठुमके, पहा व्हिडीओ

 Video Viral

 Video Viral |  सोशल मीडियावर कोण कधी व्हायरल होईल याची हामी देणे कुणालाही शक्य नाही. शहरांमधील किंवा खेड्या गावांमधील मुले इंटरनेटवर आपले रील टाकतात आणि त्यातून प्रसिद्ध होऊन पैसे, नाव कमवतात. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे, फैजु जो नुकताच खतरों के खिलाडी मध्ये दिसून आला आहे. मात्र अदिवासी भागामधून सोशल मीडियाचा वापर करत इंटरनेटवर ज्या बहिन भावांनी त्यांच्या नृत्याची अनोखी शैली चाहत्यांपर्यंत पोहचवली आहे, त्यातील टांझानियन किली पॉल नुकताच बिग बॉस 16 मध्ये दिसून आला आहे.

कायली पॉलने माधुरी दीक्षितसोबत केला डान्स
टांझानियन सोशल मीडिया स्टार किली पॉल सध्या भारतात त्याची अनोख्या शैलीची छाप सोडत आहे. तो भारतात येऊन विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे. तसेच तो अलीकडेच बिग बॉसच्या घरातही गेला होता. याशिवाय तो ‘झलक दिखला जा’च्या सेटवरही पोहोचला आहे. झलक दिखला जाच्या सेटवर त्याला बॉलिवूडमधील धक धक गर्ल माधुरी दीक्षितसोबत डान्स करण्याची संधी मिळाली आहे. त्याच्या नृत्याने सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले तर माधुरी दीक्षितसोबत त्याने जबरदस्त डान्स केला.

व्हिडीओ झाला व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर हा व्हिडिओ ‘झलक दिखला जा’च्या सेटवरील आहे. या व्हिडिओमध्ये बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी स्टेजवर दिसून येत आहे तर तिच्या सोबत टांझानियन सोशल मीडिया स्टार किली पॉलही उभा आहे. मग तिथे ‘चना के खेत में’ हे गाणं सुरू आहे आणि या गाण्यावर माधुरी दीक्षितसोबत किली पॉलने असा डान्स केला की तिथे उपस्थित लोक त्याच्या डान्सचे दिवाने झाले आहेत. लिप सिंक करून आणि बॉलिवूड गाण्यांवर डान्स करून किली पॉल सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

काइली पॉलने स्पर्धकांसोबतही केला डान्स
झलक दिखला जा 10 च्या सेटवर जेव्हा किली पॉलने माधुरी दीक्षितसोबत डान्स केला तेव्हा तिच्या चाहत्यांनी तिचा हात हातामध्ये घेतला. ‘चना के खेत में’ या गाण्यात तो माधुरी दीक्षितची नक्कल करताना दिसला. तसेच सोशल मीडियावर हा डान्स परफॉर्मन्स लोकांना खूप आवडला आहे. किली पॉलची आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित आहे तर यामुळे तो तिला भेटायला देखील आला आहे. माधुरी दीक्षित सध्या ‘झलक दिखला जा 10’ मध्ये जजची भूमिका साकारत आहे, यापूर्वी किली पॉल बिग बॉस 16 मध्येही दिसून आला होता. स्पर्धकांना नवीन टास्क देण्यासाठी तो शोमध्ये दाखल झाला होता. तिथे त्याने सर्व स्पर्धकांसोबत डान्सही केला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of Kili Paul dance on stage with Madhuri Dixit in Jhalak Dikhla Jaa checks details 10 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jhalak Dikhhla Jaa 10(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या