22 April 2025 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL
x

Cheque Bounce Rules | आता चेक बाऊन्स झाल्यास खैर नाही, जबर दंड बसेल की तुमच्या बँक खात्यावर थेट परिणाम होईल, वाचा नवीन नियम

Cheque Bounce Rules

Cheque Bounce Rules | चेक बाऊन्स प्रकरणांना व्यवस्थित हाताळण्यासाठी भारत सरकार आता नवीन नियम तयार करणार आहे. जर चुकून चेक बाऊन्स झाला तर आता तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, कारण चेक बाऊन्सच्या नियमात नवीन बदल होणार आहे. चेक बाऊन्सचे प्रकरण प्रभावीपणे हाताळता यावे, यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालय चेक जारीकर्त्याच्या इतर खात्यांमधून पैसे कापून घेण्याचा विचार करत आहे आणि गंभीर प्रकरणांमध्ये त्यांना नवीन बँक खातीही उघडण्यास बंदी घालण्यात येणार आहे. चेक बाऊन्सची वाढती प्रकरणे येत आहेत, ही एक गंभीर आर्थिक समस्या आहे. त्यामुळे केंद्रीय वित्त मंत्रालयाने नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती, ज्यामध्ये अनेक कठोर सूचना प्राप्त झाल्या आहेत, ज्या लागू करण्यावर सरकार विचार करत आहे.

नवीन नियम काय असतील
चेक बाऊन्स प्रकरणांमुळे न्याय व्यवस्थेवर अतिरिक्त भार वाढतो. म्हणून, अशा काही कठोर सूचना देण्यात आल्या आहेत ज्यात कायदेशीर प्रक्रियेपूर्वी काही कठोर पावले उचललीतर चेक बाऊन्स प्रकरणांना आळा बसेल असे सरकारला वाटते. उदाहरणार्थ, चेक जारी करणाऱ्या व्यक्तीचे चेक बाऊन्स झाले तर, त्याच्या इतर खात्यांमधून ठराविक दंड रक्कम वजा केली जाईल. इतर काही सूचनां आहेत त्यात, चेक बाऊन्सचे प्रकरण कर्ज डिफॉल्ट सारखे हाताळणे आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना कळवणे, यासारख्या सूचनांचा समावेश होतो. चेक बाऊन्स झाले की त्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर ही कमी करण्याचा विचार सुरू आहे. या सूचना स्वीकारण्यापूर्वी कायदेशीर मत घेतले जाईल, आणि चर्चा केली जाईल, असे वित्त मंत्रलायातील सूत्रांनी कळवले आहे.

या सूचनांची अंमलबजावणी झाल्यास पैसे देणाऱ्या व्यक्तीला योग्य तो धनादेश द्यायला भाग पाडले जाईल. आणि चेक बाऊन्स प्रकरण न्यायालयात नेण्याची गरज पडणार नाही. यामुळे लोकांची पैश्याची देवाण घेवाण सुरळीत होईल. खात्यात पुरेसे पैसे नसतानाही काही लोक जाणीवपूर्वक धनादेश जारी करतात, आणि हे चेक बाऊन्स होतात. असे प्रकरण कोर्टात जातात आणि अनेक वर्ष चालू राहतात. या आर्थिक बेशिस्तीला आला घालण्यासाठी सरकार नवीन नियम तयार करण्याच्या विचार करत आहे.

चेक बाऊन्सचे नियम :
चेक जारीकर्त्याच्या इतर बँक खात्यातून दंड रक्कम स्वयंचलितपणे वजा करण्यासाठी एक विश्वासू कार्यप्रणाली उभारली जाईल. इतर सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. चेक बाऊन्स झाल्याची केस कोर्टातही दाखल केली जाऊ शकते आणि हा दंडनीय गुन्हा आहे जो चेकच्या दुप्पट रकमेपर्यंत वाढू शकतो. चेक बाऊन्स प्रकरणात दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते. चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने अलीकडेच वित्त मंत्रालयाला दिलेल्या सूचनेत म्हंटले आहे की, चेक बाऊन्स झाल्यास काही दिवसांसाठी बँकेतून पैसे काढण्यावर बंधन घालावे, किंवा त्या व्यक्तीचे बँक खाते स्थगित करण्यासारखी पावले उचलावीत, जेणेकरून बाऊन्स चेक जारी करणाऱ्यांना व्यक्तीला जबाबदार धरता येईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| New Cheque Bounce Rules for handling cheque bounce cases effectively on 10 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Cheque Bounce Rules(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या