22 November 2024 1:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

पक्ष नावात 'ठाकरे' नसल्याने नेटिझन्सकडून भन्नाट प्रश्न, ही नेमकी कोणत्या बाळासाहेबांची सेना?, ठाकरे तर तिकडे आहेत

CM Eknath Shinde

Shivsena Vs Shinde Camp | केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि ठाकरे गटाला सोमवारी नाव आणि चिन्हांचे वाटप केले. यानुसार ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव मिळालं आहे. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे. याशिवाय शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. शिंदे गटाने दिलेले तिन्ही चिन्हं हे धार्मिक असल्याने ती बाद ठरविण्यात आले असल्याने अद्याप कोणतेही चिन्ह देण्यात आलेले नाही. शिंदे गटाला चिन्हांचे आणखी तीन पर्याय देण्याचे निर्देश दिले आहे.

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह दिलं आहे, पण एकनाथ शिंदे गटाला अजून कोणतंही चिन्ह देण्यात आलेलं नाही. निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून नव्याने तीन चिन्ह द्यायला सांगण्यात आली आहेत.

ठाकरे गटाने नवीन नावासाठी तीन पिढ्यांची नावे वापरून निवडणूक आयोगाला तीन पर्याय दिले होते. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रबोधनकार ठाकरे असे 3 पर्याय ठाकरे गटाने दिले होते. ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. तर, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळालं आहे. चिन्हाबाबतही निवडणुक आयोगाने निर्णय दिला आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. तर, चिन्हासाठी पर्याय सुचवण्याचे आदेश निवडणुक आयोगाने शिंदे गटाला दिले आहेत.

शिंदे गटाच्या पक्ष नावात ‘ठाकरे’ नसल्याने नेटिझन्सकडून फिरकी :
दरम्यान, एकाबाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव मिळालं असून त्यात बाळासाहेब आणि ठाकरे या दोन्ही शब्दांचा समावेश आहे. दुसरीकडे , शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालं असलं तरी त्यात ‘ठाकरे’ आडनावाचा उल्लेख नसल्याने नेटिझन्स शिंदे गटाची फिरकी घेताना दिसत आहेत. अनेकांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात तर अनेकजण प्रकाश आंबेडकर जे बाळासाहेब आंबेडकर या नावाने देखील महाराष्ट्राच्या राजकारणात परिचित असल्याने समाज माध्यमांवर जोरदार फिरकी घेत प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shinde Camp got party name as Balasahebanchi Shivsena check details 10 October 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x