Penny Stock | 4 वर्षात 4000 टक्के परतावा दिला या पेनी शेअरने, स्टॉक स्प्लिटनंतर पुन्हा स्वस्तात खरेदी करता येणार हा शेअर
Penny Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक आणि ट्रेडिंग करणाऱ्या लोकांसाठी एक मोठी बातमी आली आहे. मल्टीबॅगर कंपनी सन्मित इन्फ्राचे शेअर्स विभाजित म्हणजेच स्टॉक स्प्लिट केले जाणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. सध्या बऱ्याच कंपन्या स्टॉक स्प्लिट, बोनस शेअर्स, लाभांश जाहीर करत आहेत. अशीच एक मल्टीबॅगर सन्मित इन्फ्रा कंपनी आता आपले स्टॉक स्प्लिट करणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल थोडक्यात
स्टॉक स्प्लिट गुणोत्तर :
सन्मित इन्फ्रा कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला सादर केलेल्या कागदपत्रात माहिती दिली आहे की, “4 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीने संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिटचा प्रस्ताव पारित केला. कंपनीचा एक शेअर 10 शेअर्समध्ये विभाजित केला जाईल. त्यानंतर कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपयेवरून 1 रुपये प्रति शेअर असे होईल. कंपनीने स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख 31 ऑक्टोबर 2022 असेल, असे जाहीर केले आहे.
कंपनीच्या शेअर्सचे प्रदर्शन :
सन्मित इन्फ्रा कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात 12 टक्क्यांनी वधारले आहेत. त्याच वेळी, 6 महिन्यांपूर्वी कंपनीचे शेअर 385 रुपये किमतीवर ट्रेड करत होते,आता त्यात वाढ होऊन शेअर 552 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 6 महिन्यांत सन्मित इन्फ्रा कंपनीचे शेअर 45 टक्क्यांनी वाढले आहेत. 2022 या वर्षात सन्मित इन्फ्रा कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 85 टक्केचा मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. त्याचवेळी मागील वर्षभरात या कंपनीच्या शेअरची किंमत 170 टक्क्यांनी वधारली आहे.
शेअर 13 रुपये किमतीवर ट्रेड करत होता :
चार वर्षांपूर्वी या कंपनीचा शेअर 13 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, आता त्यात वाढ होऊन शेअर 552 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच मागील 4 वर्षात गुंतवणूकदारांनी या शेअरच्या मध्मातून 4 हजार टक्के इतका मल्टीबॅगर परतावा कमावला आहे. सन्मित इन्फ्रा ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 873 कोटी रुपये आहे. स्मॉल कॅप कंपनीत गुंतवणूक करणे जोखमीचे असते, तरी गुंतवणूक करताना कंपनी बद्दल अधिक संशोधन आणि सल्लामसलत जरूर करावी.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stocks of Sanmit Infra share price return on investment on 11 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल