23 November 2024 6:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Gold Price Today | सोन्या-चांदीत घसरण सुरूच, जाणून घ्या सोन्याचे दर आता कुठे पोहोचले?

Gold Price Today

Gold Price Today | जागतिक बाजारातून मिळालेले नकारात्मक संकेत आणि देशांतर्गत मागणीचा अभाव यामुळे आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. एमसीएक्स गोल्ड डिसेंबर वायदा 0.35 टक्क्यांनी किंवा 178 रुपयांनी घसरून 50,845 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे.

एमसीएक्स सिल्वर डिसेंबर वायदा 0.75 टक्के म्हणजेच 446 रुपयांनी घसरून 58,656 रुपये प्रति किलोग्रॅमवर आला आहे. सोमवारी सोने डिसेंबर वायदा 51,023 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. चांदी डिसेंबर वायदा 59,102 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर :
जागतिक बाजारात स्पॉट गोल्ड 0.36 टक्के म्हणजेच 6.05 डॉलरच्या घसरणीसह 1664.05 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होता. चांदीचा भाव ०.९३ टक्क्यांनी म्हणजेच ०.१८ डॉलर प्रति औंस इतका खाली येऊन १९.४५ डॉलर प्रति औंस झाला.

भारतातील प्रमुख शहरांमध्ये सोने-चांदीचे दर :
गुडरिटर्न्सच्या वेबसाईटवर जाहीर झालेल्या किंमतींनुसार देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर खालीलप्रमाणे बोलले जात आहेत:

शहर २२ कॅरेट – २४ कॅरेट अनुक्रमे :
* मुंबई 47,100 रुपये, 51,380 रुपये
* पुणे 47,130 रुपये, 51,410 रुपये
* नागपूर 47,130 रुपये, 51,410 रुपये

चांदीचे दर :
* मुंबई 59200 रुपये
* पुणे 59200 रु.
* नागपूर 59200 रु.
* नाशिक 59200 रु.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates as on 11 October 2022.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x