22 November 2024 7:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक | स्थानिक भाजपमध्ये उभी फूट, जुने भाजप पदाधिकारी मुरजी पटेल यांच्या विरोधात

Murji Patel

Andheri East By Poll Election | अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गड पडल्याने मुंबईतील ही निवडणुक प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. ही निवडणुक जिंकण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने सर्व शक्ती पणाला लावली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सेना उमेदवार ऋतुजा लटके यांचा प्रचार देखील सुरु झाला आहे. दुसरीकडे, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे.

२०१४ पासून अंधेरी पूर्व मध्ये दिवंगत सुनील यादव यांचे कार्यालय म्हणजे भाजपचे अंधेरी पूर्व मधील सत्ता केंद्र होते आणि त्यात आरएसएस समर्थकांचा भरणा होता. त्यांनीच येथे भाजप वाढविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस, शिवसेना आणि त्यानंतर भाजप असा प्रवास करत आलेले विवादित नगरसेवक मुरजी पटेल यांच्या मुठीत गेला आणि त्याला मुख्य कारण म्हणजे त्यांचे थेट आमदार आशिष शेलार यांच्यासोबत राजकीय हितसंबंध जोडले गेले आहेत.

मुरजी पटेल हे अत्यंत विवादित भाजप नेते म्हणून अंधेरी पूर्व येथे परिचित आहेत. त्यांच्या जीवन ज्योती या कार्यालयात आजही एसआरए संबंधित घरांवरून फसवणूक झालेले लोकं शिवीगाळ करून जातात. येथील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड रोष आहे. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांनी स्थनिक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन मुरजी पटेल यांनी येथील जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांना दूर केल्याने तसेच भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून सुनील यादव यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता तसेच अंधेरी पूर्व मध्ये नामांकन करताना भाजप विरोधात शक्तिप्रदर्शन केले होते आणि त्याला आशिष शेलार आणि फडणवीसांची फूस होती अशी खात्री स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना आहे. तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आडून अमित शहांचे चिरंजीव जय शहा यांच्याजवळ जाऊ पाहणारे आ. आशिष शेलार हे स्वतःकडे क्रेडिट खेचण्यासाठी मुरजी पटेल यांना पुढे करत असल्याचं वृत्त आहे.

अशा आयाराम-गयाराम उमेदवाराला भाजपने उमेदवारी देऊ नये असे येथील स्थानिक भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, तसेच ठाकरे गटाने स्वर्गीय रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिल्याने तसेच दिवंगत रमेश लटके आणि दिवंगत सुनील यादव यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते हे स्थानिक पातळीवर सर्वश्रुत असल्याने येथील स्थनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सहकार्य करतील असे येथील नेत्यांचे म्हणणे आहे. तसेच शिंदे गटाचं अंधेरी पूर्व येथे काहीच अस्तिव नसल्याने त्यांचा इथल्या स्थानिक पातळीवरील राजकारणाशी काहीही संबंध नसल्याने त्यांचा नेत्यांची अरेरावी आम्ही येथे खपवून घेणार नाही असं स्थानिक भाजप पदाधिकारी सांगत आहेत.

तसेच उमेदवारी निश्चित असताना मुरजी पटेल स्वतःला भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे, तसेच त्यांना उमेदवारी मिळणार हे भाजपच्या अनेक नेत्यांनी बोलून दाखवलं आहे. येथील गुजराती-मारवाडी समाज देखील मुरजी पटेल यांच्यावर नाराज आहे असं खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे येथे महाविकास विकास आघाडी + स्थानिक जुने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशी मुरजी पटेल यांचा विरोधात आघाडी होणार असे संकेत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mumbai Andheri East By Poll Assembly Election check details 12 October 2022.

हॅशटॅग्स

#Murji Patel(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x