23 November 2024 2:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Video Viral | पॅसेंजरने भरलेली ई-रिक्षा अचानक पलटली, मात्र बाजूने जाणाऱ्या डीएम-युपी पोलिसांच्या ताफ्याने दुर्लक्ष केलं, व्हिडिओ पहा

Rickshaw Accident Video Viral

Video Viral | पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पावसामुळे प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे पाण्याचे खड्डे साचले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर तडुंब भरलेल्या खड्ड्यामध्ये एक रिक्षा पलटली आहे. हा व्हिडीओ लखनौच्या सीतापूरचा आहे तर सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रशासनातील लोकांच्या असंवेदनशीलतेचे उदाहरण आहे.

पावसाच्या पाण्यामध्ये गाडी पलटली
तुम्ही व्हिडीओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, जेव्हा रिक्षा त्या पावसाच्या पाण्यामध्ये पलटली तेव्हा समोरून डीएम-एसपींचे वाहन शेजारून गेले. मात्र त्यांनी वाहन थांबवून चौकशी करण्याची तसदी देखील घेतली नाही. पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून ते पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. समोरून डीएम-एसपी आणि पोलिसांची गाडी येत होती मात्र पलीकडून एक ई-रिक्षा येत होती आणि खड्ड्यांमुळे ई-रिक्षाचा वेग कमी झाला मग ती ई-गाडी खड्ड्यात पलटली. तिथेच त्याचा तोल बिघडतो.

व्हिडीओ झाला व्हायरल
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रिक्षा उलटूनही अधिकाऱ्यांचे वाहन किंवा पोलिसांची गाडी तेथे थांबत नाही आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे. लोकांचे म्हणणे आहे की, मदत योग्य नसेल तर किमान माणुसकीच्या नात्याने लोकांचे हित विचारणे खूप गरजेची गोष्ट आहे. विकास नावाच्या एका ट्विटर यूजरने यावर प्रतिक्रिया देत लिहिले की, अधिकारी आणि सामान्य जनता यांच्यातील हा फरक कोणतेही सरकार दूर करू शकत नाही तसेच अशी बेलगाम नोकरशाही मी कधीच पाहिली नाही. असे घडत असेल तर कठोर कारवाईची गरज आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of e-Rickshaw accident DM SP ignored video trending on social media checks details 12 October 2022.

हॅशटॅग्स

Rickshaw Accident(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x