19 November 2024 12:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर फोकसमध्ये, आली मोठी अपडेट, शेअर पुन्हा मजबूत परतावा देणार - NSE: IRFC SBI Mutual Fund | सरकारी SBI फंडाची श्रीमंत बनवणारी योजना, केवळ 2500 रुपयांची बचत देईल 1.18 करोड रुपये - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या
x

HDFC Mutual Fund | हा एचडीएफसी म्युचुअल फंड देत आहे मजबूत परतावा, या फंडाचा पूर्ण तपशील तपासा आणि गुंतवणुकीचा विचार करा

HDFC mutual fund

HDFC Mutual Fund | HDFC स्मॉलकॅप म्युचुअल फंड हा HDFC म्युच्युअल फंड हाऊसचा स्मॉलकॅप श्रेणीतील इक्विटी फंड आहे. या म्युचुअल फंडची सुरुवात 03 एप्रिल 2008 रोजी करण्यात आली होती, आणि फंड लाँच होऊन 14 वर्षे आणि 6 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या म्युचुअल फंडाने बाजारात पदार्पण केल्यापासूनच अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी 7.68 टक्के परतावा कमावला आहे, जो सहा महिन्याच्या कालावधीत 0.14 टक्के या बेंचमार्क रिटर्नपेक्षा जास्त आहे. व्हॅल्यू रिसर्चने या म्युचुअल फंड 3 स्टार रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

फंडातील गुंतवणुकीचे उद्दिष्ट :
HDFC म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचे प्राथमिक उद्देश म्हणजे स्मॉलकॅप कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करणे, आणि भांडवल उभारणी करून दीर्घ कालावधीत जास्तीत जास्त परतावा कमावणे हा आहे. जास्त प्रसिद्ध नसलेले पण शक्तिशाली व्यवसाय व्यवस्थापन असलेल्या उद्योगात गुंतवणूक करून पैसे वाढवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा म्युचुअल फंड आदर्श मानला जातो. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की स्मॉल-कॅप कंपन्यामध्ये गुंतवणूक करणे अतिशय धोकादायक मानले जाते. दुसरीकडे, या म्युचुअल फंडाबद्दल एक सकारात्मक बाब म्हणजे HDFC म्युचुअल फंड नेहमी चांगल्या प्रकारे संशोधन करून स्मॉल-कॅप कंपनीत काळजीपूर्वक गुंतवणूक करते, जेणेकरून दीर्घकाळात गुंतवणूक मूल्य अधिक वाढवता येईल.

गुंतवणूक धोरण :
हा म्युचुअल फंड प्रामुख्याने स्मॉल-कॅप गुंतवणूक धोरणाचे पालन करतो. या म्युचुअल फंडाच्या माध्यमातून स्मॉल-कॅप शेअर्समध्ये किमान 65 टक्के गुंतवणूक केली जाते. चांगला पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी HDFC म्युचुअल फंड इतर इक्विटी आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजमध्येही गुंतवणूक करतात.

गुंतवणुकीवर परतावा :
HDFC म्युचुअल फंडाने मागील 7 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 18.06 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात HDFC म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी 16.14 टक्के वार्षिक दराने परतावा कमावला आहे. मागील 3 वर्षात HDFC म्युचुअल फंडने 26.08 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंडात गुंतवणूक केलेल्या लोकांनी मागील वर्षभरात 4.58 टक्के परतावा कमावला आहे. HDFC म्युचुअल फंडचे मार्केट कॅपिटलायझेशन 94.32 टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये आणि 5.68 टक्के गुंतवणूक रोख आणि रोख समतुल्य साधनांमध्ये गुंतवले जातात. HDFC म्युचुअल फंडाची स्मॉल-कॅप इक्विटीमध्ये 63.37 टक्के पेक्षा अधिक गुंतवणूक लागली आहे, त्यानंतर लार्ज-कॅप इक्विटीमध्ये 3.99 टक्के आणि मिड-कॅप इक्विटीमध्ये 32.54 टक्के गुंतवणूक लागली आहे. HDFC म्युचुअल फंडाची एकूण 66 शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते, त्यापैकी टॉप 10 शेअर्समध्ये अनुक्रमे 32.36 टक्के, टॉप 5 कडे 19.35 टक्के आणि टॉप 3 चे 43.94 टक्के वाटा गुंतवला आहे.

क्षेत्रनिहाय गुंतवणूक :
HDFC म्युचुअल फंडाची सेवां क्षेत्रात 20.46 टक्के गुंतवणूक आहे. भांडवली वस्तूंमध्ये 12.18 टक्के, वित्त क्षेत्रात 11.3 टक्के आणि रसायनांमध्ये 9.71 टक्के, ग्राहकांच्या वस्तू निर्माण उद्योगात 5.93 टक्के गुंतवणूक आहे. HDFC म्युचुअल फंडने बजाज इलेक्ट्रिकल्समध्ये आपल्या एकूण गुंतवणूक फंड पैकी 4.9 टक्के गुंतवणूक केली आहे. सोनाटा सॉफ्टवेअरमध्ये 4.19 टक्के गुंतवणूक, बँक ऑफ बडोदामध्ये 3.76 टक्के गुंतवणूक, फर्स्टसोर्स सोल्युशन्समध्ये 3.66 टक्के गुंतवणूक आणि eClerx सर्व्हिसेसमध्ये 3.66 टक्के गुंतवणूक केली आहे.

स्मॉलकॅप क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे कारण :
स्मॉल कॅप सेक्टर सामान्यतः गुंतवणुकदार आणि स्टॉक मार्केट विश्लेषकांना खूप आकर्षित करतो, कारण तो जेव्हा त्यात वाढ होते, त्याचा आकार प्रचंड मोठा असतो. स्मॉल कॅप कंपनीचे व्यवसाय जसजसे मोठे होत जातात तसतसे त्यातील संस्थात्मक गुंतवणूकदारांची मालकी वाढत जाते. त्यामुळे कमी किंमत असलेले इक्विटी शेअर महाग होतात गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळतो. छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणे खूप जोखमीचे असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी कंपनी बद्दल जास्तीत जास्त संशोधन करा आणि तज्ञांचा सल्ला घ्या. स्मॉल कॅप कंपन्या गुंतवणूक करण्यास जोखीम ने भरलेले असेल तरीही त्यांच्यात प्रचंड मोठा परतावा देण्याची क्षमता असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| HDFC mutual fund Investment opportunities in small cap segments for huge returns on investment 12 October 2022.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x