22 November 2024 2:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Tax on Salary | भरमसाठ पगाराला आयकर मुक्त करायचे आहे? तर मग या योजनांच्या मदतीने आता ते सहज शक्य आहे

Tax on Salary

Tax on Salary | सध्या सुरु असलेल्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती अधिक पगाराची नोकरी कशी मिळवता येईल या शोधात असतो. यासाठी हवी तेवढी मेहनत घेण्याची तयारी प्रत्येकजण दाखवत असतो. मात्र असे करत असताना तुमच्या पगाराची रक्कम वाढली की त्या पगारावर ठरावीक रकमेचा कर देखील भरावा लागतो. तुमच्यापैकी अनेक व्यक्ती वार्षिक उत्पन्न जास्त असल्याने भरमसाठ कर देखील भरत असतील. पण हा कर कमितकमी भरता यावा यासाठी अनेक उपाययोजना आहेत. या योजनांमुळे तुम्हाला तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवतायेतात आणि कमितकमी कर भरण्यास सवलत मिळते. त्या योजना नेमक्या कोणत्या आहेत हेच या बातमीमधून जाणून घेऊ.

वार्षिक उत्पन्नावरील कर कमी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना, ईपीएफ योजना, पीएफ, पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट आणि एनपीएस अशा काही योजना आहेत. या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास आयकर भरण्यापासून थोडी मुक्तता होऊ शकते आणि तुमचे पैसे तुमच्याजवळच राहू शकतात. आता या योजना आहेत तरी कशा, त्यांचा लाभ कसा घ्यावा याची माहिती जाणून घेऊ.

जेष्ठ नागरीक बचत योजनेचा लाभ कसा घ्यावा
जेष्ठ नागरीक बचत योजनेला सिनिअर सिटीजन सेविंग स्कीम असे देखील म्हणतात. ही योजना जेष्ठ नागरिकांसाठी आहे. या योजनेची मॅच्यूरीटी ५ वर्षांची आहे. यात आणखीन ३ वर्षांची सवलत दिली जाते. सध्या या योजनेत ७.६ टक्के अशा दराने व्याज मिळते. मात्र एका वर्षात तुमच्या व्याजाची रक्कम ५०,००० रुपयांवर पोहचली तर त्यावर टीडीएस कट केला जातो.

ईपीएफ योजना
ईपीएफ या योजनेत जास्तीत जास्त व्याज दर मिळतो. त्यामुळे या अकाउंटमध्ये तुम्हाला अधिक गुंतवणूक करणे आवश्याक आहे. सध्या ८.१ टक्के अशा दराने इथे व्याज मिळते. मात्र यामध्ये देखील काही अटी आहेत. ईपीएफमध्ये गुंतवणूकीत तुमच्या पीएफखात्यात अडीच लाखांपर्यंत सवलत आहे. त्या पेक्षा जास्त रक्कम पीएफमध्ये येत असेल तर मिळणा-या व्याजावर कर आकारला जातो.

पीएफ योजना
पीएफ ही एक उत्तम गुंतवणूक योजना आहे. यावर मिळणारे व्याज आणि मॅच्यूरीटीसाठी तुम्हाला कोणताही कर आकारला जात नाही. सध्या या योजनेत ७.१ टक्के व्याज मिळते. आयकर कलम ८० क अंतर्गत वर्षाला १.५० लाख रुपयांची गुंतणूक होत असल्यास ती करमुक्त असते. मात्र वार्षिक गुंतवणूक त्याहून अधिक असेल तर कर भरावा लागतो.

पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट
या योजनेत प्रत्येकासाठी वेगवेगळे व्याज दर आकारले जातात. तसेच याची मुदत एक,दोन, तीन आणि पाच वर्षांसाठी आहे. ५.५०, ५.७०, ५.८० आणि ६.७० अशा क्रमाणे एक ते पाच वर्षांसाठी व्याज मिळते. बॅंकेच्या एफडी योजने प्रमाणे ही योजना आहे. केवळ पाच वर्षे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आयकर कलम ८० क अंतर्गत ही योजना ५ वर्षांसाठीच आहे.

एनपीएस
नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजना ही देखी गुंतवणूकीसाठी फायदेशीर योजना आहे. तुम्ही खाजगी ठिकाणी नोकरी करत असाल तर तिथे म्हातारपणाचाआधार असलेल्या पेन्शनची सुविधा मिळत नाही. त्यामुळे लांबचा विचार करून तुम्ही या योजनेत गुंतणूक करू शकता. या योजनेत खातेदारकाला आयकर कलम ८० क अंतर्गत १.५ लाखरुपयांपर्यंत कर सवलत आहे. तर ८० सीसीडी १ बी अंतर्गत ५० हजार रुपयांच्या कर सवलतीचा लाभ घेता येतो. इथे आकाउंट सुरु करताना सुरूवातीला ५०० रुपये भरणे बंधणकारक आहे. या योजनेत निश्चीत दराने व्याज मिळत नाही कारण हे मार्केट लिंक्ड फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट स्वरुपात आहे. या अकाउंटमध्ये तुम्हाला वर्षाला किमान १००० रुपये भरावे लागतात. कमाल रकमेला कोणतीही मर्यादा नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tax on Salary need to save with these investment schemes 13 October 2022.

हॅशटॅग्स

#Tax on Salary(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x