23 November 2024 4:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Investment Tips | रोज ४५ रुपये बचत करा आणि वर्षाला तब्बल ३६,००० रुपये मिळवा, फायद्याची आहे ही सरकारी योजना

Investment Tips

Investment Tips | लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडीया म्हणजेच एलआयसी ही प्रथम सरकारी विमा कंपनी आहे. ज्यावेळी भारतात ही कंपनी नविन होती त्यावेळी तिच्या योजना आणि पॉलिसीने अनेक ग्रहकांना स्वत: कडे आकर्षित केले. त्यामुळे सध्याच्या घडीला जवळपास सर्वच व्यक्तींची ही विमा पॉलिसी आहे. अशात स्पर्धेचा सामना या कंपनीला देखील करावा लागत आहे. कारण आज बाजारात अशा पध्दतीचे वेगवेळे विमा पॉलिसी देणा-या अनेक कंपनी उपलब्ध आहेत. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एलआयसीने ग्राहकांसाठी एक मोठे गिफ्ट ठरणारी पॉलिसी आणली आहे. ज्यामध्ये कमितकमी गुंतवणूकीत तुम्हाला वर्षाला ३६,००० रिर्टन मिळू शकतात.

“जीवन उमंग”
“जीवन उमंग” असे या पॉलिसीचे नाव आहे. याचा फायदा घेउन तुम्ही तुमच्या बरोबरच तुमच्या कुटूंबाला सुरक्षिततेचे कवच बांधू शकता. इथे कमितकमी ४५ रुपयांची गुंतवणूक केली जाते. एवढी कमी रक्कम भरून अधिक नफा मिळवून देणा-या या पॉलिसीची सविस्तर माहिती घेऊ.

कव्हरेज अगदी १०० वर्षांपर्यंत
एलआयसीच्या जीवन उमंग पॉलिसीमध्ये विशेश बाब म्हणजे ही पॉलिसी तुम्हाला १०० वर्षांच कव्हरेज देते. यातील सर्वच तरतूदी इतर पॉलिसी पेक्षा वेगळ्या आहेत. वयोमर्यादेत ही पॉलिसी ९० दिवसांच्या बाळापासून ते ५५ वर्षांच्या व्यक्तीपर्यंत उपलब्ध आहे. या पॉलिसीला एंडॉवमेंट योजना देखील म्हटले जाते. यात मॅच्यूरीटी आणि लाइफ कवरवर एकदाच मोठी रक्कम मिळवता येते. जर या पॉलिसीचा लाभ घेणारी व्यक्ती काही कारणाने दगावली तर त्याच्या वारसदाराला अथवा कुटूंबातील एका सदस्याला ही रक्कम दिली जाते.

दर वर्षी ३६ हजार रिटर्न
यामध्ये तुम्ही ३० वर्षांसाठी दर महा १३५० रुपये हप्ता भरत असाल तर एका वर्षात तुमचे १६,२०० रुपये आणि ३० वर्षांत ४ लाख ८६ हजार रुपये जमा होतात. तुम्ही गुंतवणूक करण्याची ३० वर्षे पूर्ण झाल्यावर ३१ व्या वर्षापासून तुम्हाला दर वर्षी ३६ हजार रुपये परत केले जातात.

टॅक्समध्ये देखील सुट
या पॉलिसीमध्ये गुंतवणूक सुरु असल्यास टॅक्स भरण्यात देखील सूट मिळते. तसेच गुंतवणूक केलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू अथवा त्याला अपंगत्व आल्यास टर्म रायडरचा देखील लाभ घेता येतो. ही पॉलिसी सुरु करताना किमान दोन लाखांचा विमा असणे गरजेचे आहे. बाजारात होणा-या आर्थीक उलाढालीचा यावर कोणताही परिणाम होत नाही, तथापि एलआयसीमध्ये होणा-या नफा तोट्याचा यावर परिणाम होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Investment Tips on LIC policy for good annual return check details 13 October 2022.

हॅशटॅग्स

#Investment Tips(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x