Multiple Bank Accounts | एका पेक्षा जास्त बॅंक खाते असल्याचे फक्त तोटेच नाहीत, तर फायदे देखील आहेत, कोणते ते लक्षात ठेवा
Multiple Bank Accounts | वेगवेळ्या कारणासाठी व्यक्ती बॅंकेत आपले खाते उघडत असतात. अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांचे एका पेक्षा जास्त ठिकाणी बॅंक खाते आहेत. असे असल्यास आपल्याला याचा तोटा होऊ शकतो असं म्हटलं जातं. मात्र काही तज्ञांनी याचा फायदा देखील सांगितला आहे. तर एका व्यक्तीचे वेगवेगळ्या बॅंकेत खाते असल्यास त्याचे असणारे फायदे आणि तोटे या दोन्ही गोष्टी माहीत करून घेऊ.
तोटे :
आर्थिक सल्लगार या विषयी सांगतात की, जास्त खाती असणे तुम्हाला तोट्याचे ठरू शकते. कारण जास्त खाती असल्यास आयटीआर फाईल तयार करण्यास अडचणी निर्माण होतात. यामुळे तुमची फसवनुक होऊ शकते. जेव्हा शासनाच्या एखाद्या योजनेचा आपण लाभ घेतो तेव्हा ती रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होते. जर एका पेक्षा जास्त खाती असतील तर ते शोधण्यास देखील अडचणी येतात. यामुळे तुमचे पैसे चुकिच्या खात्यात जमा होऊ शकतात. एका व्यक्तीचे तीन पेक्षा जास्त बॅंक खाते नसावे. तीन पर्यंत असतील तर जास्त अडचणी येत नाहीत. असे वेल्थ क्रिएटर्स फायनान्शियल अॅडव्हायझर्सचे सह-संस्थापक विनित अय्यर यांनी सांगितले आहे.
फायदे :
फायद्यांविषयी सांगताना ते म्हणाले की, तीन खाते असल्यास याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या गरजा असतात. त्या नुसार पगार, मुलांचे शिक्षण, ईएमआय अशा गोष्टींसाठी स्वतंत्र खाते असल्यास फायदा होतो. इथे तुमचे पैसे नेमके कधी, कोठे आणि कोणत्या कारणासाठी खर्च झाले आहेत याची माहिती तुम्हाला मिळते. यामुळे तुमचे पैशांचे नियोजन निट राहते. लाइव्ह मिंटच्या अहवालानुसार एसएजी इन्फोटेकचे एमडी अमित गुप्ता सांगतात की, पैसे विभागून ठेवल्याने तुमच्यावर कधीच आर्थिक संकट येणार नाही. तुम्ही जमा झालेले अथवा बचत केलेले पैसे गरज भासल्यास सहज वापरू शकता.
तसेच जेव्हा तुम्हाला जास्त पैशांची गरज भासते तेव्हा वेगवेगळ्या खात्यात जमा झालेली रक्कम तुम्ही वापरू शकता. यावेळी तुम्ही तुमच्या दोन्ही बॅंक खात्याचा वापर करू शकता. चार्टर्ड अकाऊंटेंट राजेंद्र वाधवा सांगतात की, जर तुमचे एका पेक्षा जास्त ठिकाणी बॅंक खाते असते तेव्हा बॅंक बुडल्यावरही तुमचे जास्त नुकसान होत नाही. बॅंक बुडल्यावर शासनामार्फत खातेदारकाला ५ लाख रुपये दिले जातात. त्यामुळे तीन खाती असतील तर तुमचा फायादा देखील आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multiple Bank Accounts advantages need to remember check details 14 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- Money 15-15-15 Formula | तुमचं आयुष्य बदलेल हा पैसा वाढवणारा 15-15-15 चा फॉर्म्युला, धन संप्पतीत होईल वाढ - Marathi News
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- CIBIL Score | नोकरदारांनो, 'या' 4 प्रकारे झटपट वाढेल तुमचा सिबिल स्कोअर, पटापट मंजूर होईल पगारदारांचं कर्ज - Marathi News
- NPS Calculator | पगारदारांनो, महागाई प्रचंड वाढतेय, महिना 1.5 लाख रुपये पेन्शन हवी असल्यास NPS मध्ये किती बचत करावी
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News