23 November 2024 4:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Multiple Bank Accounts | एका पेक्षा जास्त बॅंक खाते असल्याचे फक्त तोटेच नाहीत, तर फायदे देखील आहेत, कोणते ते लक्षात ठेवा

Multiple Bank Accounts

Multiple Bank Accounts | वेगवेळ्या कारणासाठी व्यक्ती बॅंकेत आपले खाते उघडत असतात. अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांचे एका पेक्षा जास्त ठिकाणी बॅंक खाते आहेत. असे असल्यास आपल्याला याचा तोटा होऊ शकतो असं म्हटलं जातं. मात्र काही तज्ञांनी याचा फायदा देखील सांगितला आहे. तर एका व्यक्तीचे वेगवेगळ्या बॅंकेत खाते असल्यास त्याचे असणारे फायदे आणि तोटे या दोन्ही गोष्टी माहीत करून घेऊ.

 तोटे :
आर्थिक सल्लगार या विषयी सांगतात की, जास्त खाती असणे तुम्हाला तोट्याचे ठरू शकते. कारण जास्त खाती असल्यास आयटीआर फाईल तयार करण्यास अडचणी निर्माण होतात. यामुळे तुमची फसवनुक होऊ शकते. जेव्हा शासनाच्या एखाद्या योजनेचा आपण लाभ घेतो तेव्हा ती रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होते. जर एका पेक्षा जास्त खाती असतील तर ते शोधण्यास देखील अडचणी येतात. यामुळे तुमचे पैसे चुकिच्या खात्यात जमा होऊ शकतात. एका व्यक्तीचे तीन पेक्षा जास्त बॅंक खाते नसावे. तीन पर्यंत असतील तर जास्त अडचणी येत नाहीत. असे वेल्थ क्रिएटर्स फायनान्शियल अॅडव्हायझर्सचे सह-संस्थापक विनित अय्यर यांनी सांगितले आहे.

फायदे :

फायद्यांविषयी सांगताना ते म्हणाले की, तीन खाते असल्यास याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या गरजा असतात. त्या नुसार पगार, मुलांचे शिक्षण, ईएमआय अशा गोष्टींसाठी स्वतंत्र खाते असल्यास फायदा होतो. इथे तुमचे पैसे नेमके कधी, कोठे आणि कोणत्या कारणासाठी खर्च झाले आहेत याची माहिती तुम्हाला मिळते. यामुळे तुमचे पैशांचे नियोजन निट राहते. लाइव्ह मिंटच्या अहवालानुसार एसएजी इन्फोटेकचे एमडी अमित गुप्ता सांगतात की, पैसे विभागून ठेवल्याने तुमच्यावर कधीच आर्थिक संकट येणार नाही. तुम्ही जमा झालेले अथवा बचत केलेले पैसे गरज भासल्यास सहज वापरू शकता.

तसेच जेव्हा तुम्हाला जास्त पैशांची गरज भासते तेव्हा वेगवेगळ्या खात्यात जमा झालेली रक्कम तुम्ही वापरू शकता. यावेळी तुम्ही तुमच्या दोन्ही बॅंक खात्याचा वापर करू शकता. चार्टर्ड अकाऊंटेंट राजेंद्र वाधवा सांगतात की, जर तुमचे एका पेक्षा जास्त ठिकाणी बॅंक खाते असते तेव्हा बॅंक बुडल्यावरही तुमचे जास्त नुकसान होत नाही. बॅंक बुडल्यावर शासनामार्फत खातेदारकाला ५ लाख रुपये दिले जातात. त्यामुळे तीन खाती असतील तर तुमचा फायादा देखील आहे.

महत्वाचं
: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multiple Bank Accounts advantages need to remember check details 14 October 2022.

हॅशटॅग्स

#Multiple Bank Accounts(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x