19 November 2024 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Zomato Share Price | 2 महिन्यात झोमॅटो शेअरने 62 टक्के परतावा दिला, शेअर वेगाने वाढतोय, स्टॉक विकत घ्यावा का पहा

Zomato share price

Zomato Share Price | मागील अडीच महिन्यांत Zomato कंपनीचे शेअर्स 62 टक्के वधारले आहेत. चालू वर्ष 2022 मध्ये 27 जुलै 2022 रोजी Zomato कंपनीचे शेअर्स 40.55 रुपयांवर ट्रेड करत होते. 11 ऑक्टोबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर Zomato कंपनीचा स्टॉक 65.60 रुपये किमतीवर बंद झाला होता. शेअर बाजारातील विश्लेषकांचे मत आहे की, झोमॅटो कंपनीचे शेअर्स येणाऱ्या काळात 91 टक्के अधिक वाढू शकतात. शेअर बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे की, झोमॅटो कंपनीचा तिमाही आणि वार्षिक तोटा सप्टेंबरच्या तिमाहीत कमी होऊ शकतो. Zomato कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 169.10 रुपये होती.

सप्टेंबर तिमाहीत तोट्यात घट :
सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत zomato कंपनीचा तोटा 150 कोटी रुपयेपर्यंत खाली येऊ शकतो. शेअर बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे की, फूड डिलिव्हरी कंपनीचे उच्च मार्जिन योगदान आणि वाढता महसूल यामुळे EBITDA तोटा कमी होण्याची शक्यता आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत झोमॅटोचा तोटा 149.20 कोटी रुपये असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जून 2022 तिमाहीत Zomato कंपनीचा तोटा 185.70 कोटी रुपये होता, आणि मागील वर्षी हा तोटा 435.10 कोटी होती. ब्रोकरेज हाऊसने झोमॅटोची विक्री 48.2 टक्के वाढून 1517.90 कोटी रुपये पर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत zomato ची विक्री 1024.20 कोटी रुपये होती, जी चालू वर्षाच्या तुलनेत कमी होती.

पुढील लक्ष किंमत :
ब्रोकरेज हाऊसेस zomato कंपनीच्या शेअरची पुढील लक्ष किंमत 125 रुपये असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. झोमॅटोने ऑगस्ट 2022 मध्ये ब्लिंकिटचे अधिग्रहण पूर्ण केले होते. ब्रोकरेज हाऊस एडलवाईसला सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत झोमॅटोचा तोटा 165.20 कोटी राहण्याचा अंदाज आहे. कंपनीचा तिमाही महसूल 50 टक्के वाढी 1538 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. JM फायनान्शियलने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, सप्टेंबर तिमाहीत झोमॅटोचा तोटा 151.40 कोटी रुपये असेल. JM फायनान्शिअलने झोमॅटो कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत 125 रुपये निश्चित केली आहे. त्याच वेळी एडलवाईसने झोमॅटोची टारगेट प्राईस 80 रुपये निश्चित केली आहे. ICICI Direct ने 28 सप्टेंबर 2022 रोजी Zomato कव्हरेज लाँच केले होते, आणि zomato ची टारगेट प्राईस 90 रुपये निश्चित केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Zomato share price return on investment and New Target price has been declared by brokerage firms on Zomato on 13 October 2022.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x