22 November 2024 8:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Multibagger Stocks | मूर्ती लहान पण कीर्ती महान, या शेअरने 26 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटीचा परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा

Multibagger stock

Multibagger Stocks | शेअर बाजारात अनेक स्मॉल कॅप कंपन्यांनी आपल्या शेअर धारकांना भरघोस परतावा देऊन मालामाल केले आहे. अनेक स्मॉल कॅप कंपन्या पूर्णपणे अनभिज्ञ राहतात ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसते, किंवा ते जास्त लोकप्रिय नसतात. आज आपण या लेखात अशा एका स्मॉल कॅप कंपनी बद्दल माहिती घेणार आहोत, ज्याबद्दल लोकांना जास्त माहिती नाही, पण शेअर बाजारात या कंपनीने आपल्या कमालीच्या कामगिरीने गुंतवणूकदाराना मालामाल केले आहे. आपण ज्या कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत, तिचे नाव आहे,”सरस्वती कमर्शियल इंडिया लिमिटेड”. फक्त 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 4 कोटींचा परतावा कमावून दिला आहे. ही एक स्मॉल कॅप NBFC कंपनी असून तिचे बाजार भांडवल 336.89 कोटी नोंदवण्यात आले आहे.

शेअर्सची कामगिरी :
12 ऑक्टोबर 2022 रोजी सरस्वती कमर्शियल कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 3,271.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 जुलै 2017 रोजी सरस्वती कमर्शिअल कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर पहिल्यांदा लिस्ट झाले होते, तेव्हा त्याची ओपनिंग किंमत 8.40 रुपये होती. या शेअरची किंमत मागील 5 वर्षांत 8.40 रुपयेवरून 3,271.05 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
मागील 5 वर्षात या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना 38,841 टक्केचा अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. याचा अर्थ असा होतो की, जी तुम्ही 13 जुलै 2017 रोजी सरस्वती कमर्शिअलच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.89 कोटी रुपये झाले असते. स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरची किंमत कमी असते, पण जेव्हा ते तेजीत येतात, करोडोचा परतावा देतात. जर तुम्ही त्या सुरुवातीच्या काळात सरस्वती कमर्शियलच्या शेअरमध्ये केवळ 26 हजार रुपये लावले असते तर आज तुम्हाला 1 कोटी रुपयेपेक्षा अधिक परतावा मिळाला असता.

शेअरची वाटचाल :
सरस्वती कमर्शिअल कंपनीच्या शेअर्सचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 66 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात स्टॉक मध्ये 7.36 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली होती, पण आता स्टॉक स्थिर किमतीवर ट्रेड करत आहे. चालू वर्ष 2022 मध्ये या शेअर्समधे 19.31 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील एका वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 66 टक्के परतावा कमावून दिला असून मागील एका वर्षात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4,600 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
सरस्वती कमर्शियल इंडिया लिमिटेड कंपनीची स्थापना 1983 मध्ये कोलकाता या ठिकाणी झाली होती. सरस्वती कमर्शियल इंडिया लिमिटेड ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी असून गैर बँकिंग वित्तीय सेवा कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय मुंबईत येथे स्थित आहे. ही स्मॉल कॅप कंपनी शेअर्स, सिक्युरिटीज, कर्ज रोखे आणि गुंतवणूकीचा व्यवसाय करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger stock of Saraswati Commercial India Limited Company share price return on investment on 14 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x