22 November 2024 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Viral Video | निष्काळजीपणा भोवला, महिलेच्या डोळ्यात अडकलेल्या तब्बल 23 कॉन्टॅक्ट लेन्सेस डॉक्टरांनी अशा काढल्या, पहा व्हिडीओ

Viral Video

Viral Video | त्रास कमी पडावा म्हणून आपण काही गोष्टी सोप्या करून ठेवतो मात्र त्याचा आपल्याला आयुष्यभरासाठी त्रास होऊ शकतो हे लक्षात घेणे सुद्धा महत्वाचे आहे. चश्मा काढावा आणि घालावा लागेल म्हणून आपण लेन्स वापरतो मात्र आपण त्याची काळजी घेतली नाही तर त्याचा कितपत त्रास होऊ शकतो हे तुम्ही तुमच्या डोळ्यांना पहा. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये तु्म्ही पाहू शकता की, एका आज्जीच्या डोळ्यातून तब्बल 23 कॉन्टॅक्ट लेन्स बाहेर काढल्या आहेत.

आज्जीच्या डोळ्यातून बाहेर काढल्या 23 कॉन्टॅक्ट लेन्स
चष्मा घालणे टाळण्यासाठी लोक कॉन्टॅक्ट लेन्स जास्त प्रमाणात वापरतात मात्र लेन्सचा वापर अत्यंत जपून करावा लागतो. जेव्हा तुम्ही लेन्स वापरता तेव्हा हातांना स्वच्छ ठेवा, जेव्हा तु्म्ही तो हात डोळ्यांना लावता त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. लेन्सबद्दलचा थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाऊ शकतो. दरम्यान, एक स्त्री रोज रात्री कॉन्टॅक्ट लेन्स काढायला विसरायची आणि दुसऱ्या दिवशी नवीन लेन्स घालायची आणि अशा प्रकारे या महिलेच्या डोळ्यात 23 कॉन्टॅक्ट लेन्स जमा झाल्या होत्या. जेव्हा प्रकरण हाताबाहेर गेले तेव्हा महिलेला या लेन्स काढण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी लागली.

व्हिडिओ डॉक्टरांनी इन्स्टाग्रामवर केला शेअर
आज्जी बाईंच्या डोळ्यांमधील 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढतानाचा हा व्हिडिओ डॉक्टरांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना डॉक्टरांनी यावेळी लिहिले आहे की, ‘काल मला माझ्या क्लिनिकमध्ये कॉन्टॅक्ट लेन्सचा एक समूह पाहायला मिळाला’. या महिलेच्या डोळ्यांच्या वरच्या भागामध्ये सर्व कॉन्टॅक्ट लेन्स जमा झाल्याचे व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो. तसेच डॉक्टरांनी सांगितले की त्यांनी डोळ्यातील लेन्स काढण्यासाठी एक अतिशय लहान शस्त्रक्रिया उपकरण वापरला आणि या महिलेच्या डोळ्यात सर्व लेन्स एका ठिकाणी चिकटल्या होत्या, त्यामुळे त्या काढण्यासाठी डॉक्टरांनी फ्लोरॉक्स नावाचे औषध वापरले, ज्यामुळे लेन्स निळ्या ऐवजी हिरव्या दिसू लागल्या आणि लेन्सचा समूह काढताना मदत झाली.

व्हिडीओ व्हायरल झाला
इंस्ट्राग्रावर डॉक्टरांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, या घटनेची माहिती घेतल्यानंतर यूजर्स अनेक प्रश्न विचारत आहेत तसेच एका यूजरने लिहिले की, कोणीतरी लेन्स काढणे कसे विसरू शकते, तेही 23 दिवसांसाठी तर एकाने लिहिले, हा मोठा निष्काळजीपणा आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of doctor operated And Found 23 Contact Lenses Woman Eye Checks details 18 October 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x