22 November 2024 2:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Digital Gold | डिजिटल सोन्यात गुंतवणुक करणे आवडते? तर डिजिटल गोल्डची खरेदी-विक्री प्रक्रिया सविस्तर वाचा

Digital Gold

Digital Gold | भारतीय लोकांना सोने खरेदी करण्याचा छंदच असतो. जगात सर्वात जास्त सोन्याची खरेदी आणि साठवण भारतीय लोकाकडून केली जाते. नवरात्री आणि दसरा साजरे केल्यानंतर आता आपण दिवाळी आणि धनत्रयोदशी साजरे करण्याची तयारी करत असाल. यां सणांमध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. जगात सोने खरेदी करण्यात चीननंतर भारतचा नंबर लागतो. सोन्याच्या बाबतीत भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा उपभोक्ता आहे. खरं तर भारतीय लोकांसाठी कोणताही विशेष प्रसंग असो, लग्न, मुलाचा जन्म किंवा एखादा सण हे सर्व सोनू शिवाय अपूर्ण असतात.

तथापि, भौतिक सोने खरेदी कारणे आणि त्यांची साठवण करून ठेवणे कठीण असते. अनेक वेळा सोन्याची शुद्धता निश्चित करण्यात अडचण येतात आणि सोन्याच्या सुरक्षित साठवणुकीवर भरपूर लक्ष देण्याची गरज असते. आता काळजी करू नका, सोन्यात गुंतवणुक करण्याचे अनेक नवीन मार्ग निर्माण झाले आहेत. सध्याच्या डिजिटल युगात काहीही अशक्य नाही. सध्या डिजिटल गोल्डने लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले आहे. डिजिटल गोल्ड नुकताच बाजारात लाँच झाले आहेत आणि ते सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाले आहेत, कारण ते सहजपणे खरेदी केले जाऊ शकते आणि ते साठवणेही खूप सोपे आहे.

डिजिटल गोल्ड म्हणजे काय? : डिजिटल गोल्ड हे खरे सोनेच असते पण त्याची खरेदी विक्री आणि साठवण ऑनलाइन पद्धतीने करतात म्हणून त्याला डिजिटल गोल्ड म्हणतात. कोणत्याही मौल्यवान धातूची प्रत्यक्षात साठवणूक न करता सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा एक वरच्युअल मार्ग आहे. डिजिटल गोल्डची खरेदी विक्री एकदम सोपी आहे. जेव्हा तुम्ही डिजिटल सोने खरेदी कराल तेव्हा तुम्हाला त्यांची पावती किंवा बिलाच्या स्वरूपात तुमच्या खरेदीचा पुरावा दिला जाईल, आणि सोने विक्रेता तुमच्या वतीने तितके सोने सुरक्षित व्हॉल्टमध्ये जमा करून ठेवेल.

डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीचे फायदे :
1) PhonePe, Paytm, HDFC सिक्युरिटीज, मोतीलाल ओसवाल आणि विविध मोबाइल वॉलेट, UPI अॅप्स आणि बँकांचा वापर करून तुम्ही तुमच्या सोयीनुसार डिजिटल गोल्ड ची खरेदी-विक्री करू शकता.
2) डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुक केल्यास तुम्हाला अचूकतेची पूर्ण हमी दिली जाते. यात फसवणुकीची कोणतीही शक्यता नाही. डिजिटल गोल्ड नेहमी 24 कॅरेट शुद्ध स्वरूपात असते. डिजिटल गोल्डमध्ये तुम्हाला 99 टक्के शुद्धतेची हमी दिली जाते.
3) सुरक्षित साठवणूक करण्यात डिजिटल गोल्ड अधिक सुलभ आहे. तुम्हाला सोने प्रत्यक्ष साठवून ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला सोन्याची सुरक्षित साठवणुकीची वेगळी भौतिक सोय करण्याचीही आवश्यकता नाही.
4) प्रत्यक्षात सोन्याची खरेदी विक्री करण्यासाठी तुम्हाला ज्वेलर्सला भेट द्यावी लागते. पण डिजिटल सोने गोल्ड वॉलेट मध्ये साठवलेले असतात जे थेट चोवीस तास बाजारातील सोन्याच्या किमतीनुसार दर वापरून विकले जाऊ शकतात. तुमची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल.
5) डिजिटल सोन्याच्या व्यवहारात गुंतलेल्या ज्वेलर्सकडे जाऊन तुम्ही डिजिटल गोल्ड प्रत्यक्ष सोन्यामध्ये रूपांतरित करू शकता.
6) डिजिटल सोने खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम गुंतवणूक करण्याची गरज नाही. अनेक कंपन्या तुम्हाला सोन्यात कोटी गुंतवणूक करण्याचीही परवानगी देतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Digital Gold investment opportunities and benefits on Investment in festival season in India on 14 October 2022.

हॅशटॅग्स

Digital gold(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x