24 November 2024 9:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Loan Guarantor | लोण गॅरेंटर झाले असाल किंवा होणार असाल तर या गोष्टीं लक्षात ठेवा, अन्यथा बसा त्यांचं कर्ज फेडत

Loan Guarantor

Loan Guarantor | घर आणि मोठी मालमत्ता विकत घेताना अनेक व्यक्ती बँकेत धाव घेतात. कारण यासाठी मोठी आर्थिक गरज भासते जी बँक पूर्ण करत असते. अशात कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडून अनेक कागदपत्रांवर सही करून घेतली जाते. यात त्या व्यक्तीकडून हमी देखील घेतली जाते. तसेच बँक कर्ज मान्य करताना फक्त एवढ्यावर थांबत नाही. आणखीन बऱ्याच गोष्टींची हमी घेतली जाते. ज्यात ग्यारंटरचा देखील समावेश आहे. ग्यारंटर नसेल तर बँक कोणालाही कर्ज देण्यास तयार होत नाही. त्यामुळे कर्ज घेताना तुमच्याकडे विश्वासाचे तीन तरी ग्यारंटर असावे लागतात. आता जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी ग्यारंटर होत असाल तर जरा सावध व्हा. कारण ग्यारंटर होणे ही फक्त एक औपचारीकता नाही तर खूप मोठी जबाबदारी असते. यात अनेक वेळा तुम्ही चांगलेच गोत्यात येऊ शकता.

ग्यारंटरची जबाबदारी
अनेक व्यक्तीचा असा समज आहे की, ग्यारंटर हे फक्त एका व्यक्तीला कर्ज देण्यासाठी एक फॉर्मिलिटी म्हणून घेतले जातात. तुमचा देखील असा समज असेल तर तुम्ही चुकत आहात. कारण कोणतीही बँक उगच कोणतेही पाऊल उचलत नाही. अनेक वेळा कर्ज घेतलेली व्यक्ती अपघात किंवा अन्य कारणाने दगावते तेव्हा बँकेचे पैसे बुडतात असे कधीच होत नाही. असे होऊ नये म्हणूनच बँक ग्यारंटर घेते असते. जेव्हा तुम्ही ग्यारंटर म्हणून स्वाक्षरी करता तेव्हा तुम्ही देखील कर्जदार झालेले असता. कर्ज घेतलेला व्यक्ती जोवर पूर्ण कर्जाची परतफेड करत नाही तोवर तुमच्याही डोक्यावर टांगती तलवार असते. अशात जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्याने कर्ज भरलेच नाही तर ते कर्ज ग्यारंटरला भरावे लागते. बँक यासाठीच कागदपत्रांवर तुमची स्वाक्षरी घेत असते. तसेच तुम्ही ती स्वक्षिरी करून हा नियम मान्य केलेला असतो. अशात जर त्या व्यक्तीने बरेच कर्ज थकवले असेल तर त्याचे व्याज देखील तुमच्याकडून वसूल केले जाते.

कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले
जर तुम्ही ग्यारंटर असाल आणि सदर व्यक्तीने कर्ज भरले नसेल तर बँक आधी तुमच्याकडे येते. तुमच्याकडे विचारणा केल्यावर जर तुम्ही देखील नकार दिला तर बँक तुमच्यावर आणि कर्जदारावर कायदेशीर कारवाई करते. यावेळी तुम्हाला कर्ज फेडण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीसाठी ग्यारंटर होत आहेत तो व्यक्ती तुमच्या ओळखीचा आणि विश्वासातला आहे की नाही याची खात्री करून घ्या. जर व्यक्ती विश्वासाची नसेल तर चुकूनही त्याच्यासाठी ग्यारंटर होऊ नका.

ग्यारंटर असूनही कर्ज भरण्यातून करा स्वतःचा बचाव
जर कोणी तुम्हाला ग्यारंटर होण्यास विनंती केली तर तुम्ही सर्वता आधी त्या व्यक्तीला स्वतःची विमा पॉलिसी काढण्यास सांगा. तसे केल्यास तुम्हाला भुर्दंड सोसावा लागणार नाही. जर विमा असेल तर बँक त्यांच्याकडे कोणतीही कारवाई करणार नाही. सदर व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपोआप बँकेचे कर्ज कर्जदाराच्या विमा कंपनीकडे वळते. त्यामुळे बँक हे कर्ज विमा कंपनीकडून वासून करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Loan Guarantor Take care of this or else you will fall into trouble 15 October 2022.

हॅशटॅग्स

Loan Guarantor(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x