26 November 2024 3:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

Online Passport | तुमच्याकडे पासपोर्ट नसल्यास ऑनलाइन पासपोर्ट अर्ज करू शकता, असा स्टेप बाय स्टेप ऑनलाइन अर्ज करा

Online Passport

Online Passport | परदेशी जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे पास्पोर्ट असावा लागतो. दुस-या देशात जाताना याची आपल्याला गरज पडते. पासपोर्ट मिळवण्यासाठी आधी खूप मोठी प्रोसेस पार करावी लागत होती. मात्र तुम्ही घर बसल्या ऑनलाइन पासपोर्टसाठी अर्ज करू शकता याची प्रक्रिया देखील अगदी सोपी आणि सहज समजणारी आहे. त्यामुळे आज या बातमीतून पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा हे माहिती करून घेऊ.

अनेक तरूण मुलं मुली उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा निर्णय घेतात. त्यावेळी त्यांना पासपोर्टची गरज असते. तसेच काही व्यक्ती कामानिमित्त, देवदर्शनासाठी पास्पोर्ट काढून घेतात. गेल्या काही वर्षांपासून अनेक व्यक्ती परदेशी वा-या करत आहेत. त्यामुळे पासपोर्टची मागणी वाढली आहे. हिच बाब लक्षात घेता साल २०१० साली पासपोर्ट सेवा परियोजना ( PSP) सेवा सुरू करण्यात आली.

पासपोर्ट मिळवण्यासाठी आधी पोलिसांकडून काही कागदपत्रे जमा करावी लागायची. ही प्रक्रिया फार वेळखाउ होती. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुमच्या घरी पासपोर्ट पोस्टाने पाठवले जाते. मात्र आता ही वेळखाऊ पध्दत सोपी झाली आहे. ऑनलाईन पध्दतीने देखील आता तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा :
* आधी portalindia.gov.in पासपोर्टसेवेच्या या संकेत स्थळावर भेट द्या.
* त्यानंतर होम स्क्रीनवरील रजीस्टर नाउवर क्लीक करा.
* रजिस्टेशन झाल्यवर तेथे लॉगइन करा.
* लॉगइन केल्यावर नविन पास्पोर्टसाठी दिसत असलेल्या सुचनेनुसार Apply या
* बटणावर क्लीक करा.
* त्यानंतर View Saved/Submitted Applications वर क्लीक करा.
* या सेवेचे किमान शुल्क भरण्यासाठी पे आणि शेड्यूल अपॉइंटमेंट यावर जा.
* PSK/POPSK/PO आयोजीत भेटीसाठी ऑनलाइन शुल्क भरावे लागेल.
* रेग्यूलर दर हा १,५०० रुपये आहे तर तात्काळसाठी २००० रुपये दर आहे.
* भरलेली रक्कम अर्ज पावती प्रींटवर मिळेल आणि तुमचे पैसे जमा झाले आहेत असा मॅसेज देखील येईल.
* पासपोर्ट सेवा केंद्र (PSK) / प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) येथे मॅसेजमध्ये सांगितलेल्या दिवशी तुमचा अर्जघेउन जा.
* रेग्यूलरमध्ये अर्ज असल्यस त्याला १५ ते २० दिवसांचा कालावधी लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

 News Title | Online Passport application online process check details 16 October 2022.

हॅशटॅग्स

Online Passport(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x