22 November 2024 6:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे
x

नागपूर जिल्हा पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ करून घेतल्यावर बावनकुळे अंधेरी पूर्व साठी सज्ज

Andheri East By Poll

Andheri East By Poll Election | नागपूर जिल्ह्यात झालेल्या पंचायत समिती सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला एकही पंचायत समितीवर सभापती होऊ शकला नाही. फक्त दोन तालुक्यात उपसभापती पदावर भारतीय जनता पक्षाला समाधान मानावे लागले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यात पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची पाटी कोरी राहिली आहे. तर दुसरीकडे संख्याबळाच्या आधारावर काँग्रेसला मोठ यश मिळाले आहे.

दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा अंधेरीची पोटनिवडणूक जिंकण्याचा ठाम दावा केलाय. आम्ही अंधेरीची पोट निवडणूक जिंकणारच आहोत. त्यात कुठलीच शंका नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत. लोक आम्हाला निवडून देतील, असं बावनकुळे म्हणाले आहेत. याच सोबत त्यांनी पुढच्या निवडणुकीतील निकालाबाबतही भाष्य केलंय.

सध्या महाराष्ट्रात विधानसभा पोटनिवडणुकीचं वारं वाहतंय. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक लागली आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ही निवडणूक होतेय. ठाकरे आणि शिंदेगटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Andheri East By Poll Election BJP state president statement check details 16 October 2022.

हॅशटॅग्स

#Murji Patel(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x