22 November 2024 12:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Multibagger Stocks | 1 वर्षात 547 टक्के परतावा देणारा शेअर हा स्प्लिट, स्टॉक स्वस्त किमतीत मिळतोय, खरेदी करावा का?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी “मेफकॉम कॅपिटल मार्केट्स लिमिटेड” ने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सादर केलेल्या कागदपत्रात स्टॉक स्प्लिटबाबतची सर्व माहिती दिली आहे. परताव्याच्या बाबतीत या कंपनीने चालू वर्षात मजबूत नफा कमावून दिला आहे. स्टॉक स्प्लिट केल्यावर या कंपनीचे स्टॉक विभागले जातील.

कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत कंपनीचे शेअर्स 1:5 या प्रमाणात विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. “10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरचे विभाजन 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 5 शेअर्समध्ये केले जाईल. स्टॉक स्प्लिट केल्यावर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य कमी होते”. कंपनीने या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर केली नाही. कंपनीचे बाजार भांडवल 94.37 कोटी रुपये आहे.

शेअर्सची कामगिरी :
“मेफकॉम कॅपिटल” मार्केट्स कंपनीच्या शेअरची किंमत शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.99 टक्क्यांनी पडली होती, आणि स्टॉक या घसरणीसह 103.25 रुपये किंमत पातळीवर बंद झाला होता. 9 जुलै 2002 रोजी या कंपनीचा शेअर 6.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरची किमत 1,422.86 टक्क्यांनी वर गेली आहे. 27 ऑक्टोबर 2017 रोजी, मेफकॉम कॅपिटल मार्केट्स कंपनीचा शेअरची फक्त 19.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 434.97 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. 15 नोव्हेंबर 2019 रोजी या कंपनीच्या शेअर 10.05 रुपये किमतीवर व्यवहार करत होता. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरवर पैसे लावले होते, त्याना आता 927.36 टक्के अधिक परतावा मिळाला आहे.

एका वर्षात शेअरची वाटचाल :
18 ऑक्टोबर 2021 रोजी या कंपनीचा शेअर 15.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरची किंमत 547.34 टक्के वर गेली आहे. त्याच वेळी, 2022 या चालू वर्षांत 3 जानेवारी रोजी या कंपनीचा शेअर 48.30 रुपयेवर व्यवहार करत होता. तेव्हापासून कंपनीच्या शेअरच्या किमतीत 113.77 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 6 महिन्यांपूर्वी या लोकांनी या स्टॉक मधे गुंतवणूक केली होती, त्यांना आता 251.79 टक्के परतावा झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किमत 11.08 टक्क्यांनी वर गेली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger stock of Mefcom Capital market share price return on investment on 17 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x