22 November 2024 6:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Multibagger Stocks | 201 टक्के परतावा देणारा हा मल्टिबॅगर शेअर कंपनीच्या राइट्स इश्यूमुळे स्वस्तात मिळतोय, स्टॉक खरेदी करावा का?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | रिअल इस्टेट क्षेत्रातील खाजगी कंपनी “श्रद्धा प्राइम प्रोजेक्ट्स” लिमिटेड एक स्मॉल कॅप कंपनी असून शेअर बाजारात SME इंडेक्स अंतर्गत सूचीबद्ध आहे. कंपनीने नुकताच आपल्या भागधारकांना माहिती कळवली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत राइट्स इश्यू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, कंपनी आपल्या विद्यमान भागधारकांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत कंपनीचे अधिक शेअर्स खरेदी करण्याची संधी देणार आहे. ​

कंपनीने नुकताच स्टॉक एक्सचेंजला सादर केलेल्या कागदपत्रात माहिती दिली आहे की, 11 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाने बैठकीत राइट्स इश्यूच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. मात्र, राइट्स इश्यूचा आकार आणि रेकॉर्ड तारीख कंपनीने अद्याप जाहीर केली नाही. राइट्स इश्यू मध्ये कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना नवीन शेअर्स खरेदी करण्याची संधी देणार आहे.

10 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचा शेअर 17.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 201.56 टक्क्यांची मजबुती वाढ पाहायला मिळाली आहे. एक वर्षभरापूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांनी आतापर्यंत 53.98 टक्के परतावा कमावला आहे. 2022 मध्ये या कंपनीने सकारात्मक प्रदर्शन केले आहे. शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. या रिअल इस्टेटच्या कंपनीचे स्टॉक 33.13 टक्के वर गेले आहेत. कंपनीचे प्रॉमोटर्स कंपनीतील एकूण गुंतवणुकीपैकी 75.22 टक्के वाटा होल्ड करत आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांकडे कंपनीचे एकूण 24.56 टक्के स्टॉक आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of Shraddha Prime Projects share price return on investment on 17 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x