25 November 2024 11:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

राज ठाकरेंनंतर शिंदे समर्थक आमदार मुख्यमंत्र्यांच्या थेट भेटीपेक्षा पत्रातून व्यक्त करतात, संस्कृतीआडून 'राजकीय खेळ' सर्वांना कळून चुकली?

Andheri East By Poll

Andheri East By Poll Election | रविवारी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं. रमेश लटकेंच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके निवडणूक लढवत असून, ती बिनविरोध व्हावी. भाजपनं निवडणूक लढवू नये, अशी विनंती राज ठाकरेंनी फडणवीसांना केली. त्यावर गांभीर्यानं विचार करू असं फडणवीस म्हणाले.

त्यानंतर अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपच्या नेत्यांशी चर्चा करावी, असं प्रताप सरनाईक पत्रात म्हणाले. सरनाईकांनी शिंदेंना पाठवलेलं पत्र समोर आल्याच्या काही तासानंतर देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार या भाजपच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची बैठकी झाली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळ ठाण्यातील राजकीय नेते असताना त्यांचे समर्थक आमदार प्रताप सरनाईक मुख्यमंत्र्यांना थेट भेटण्याऐवजी पात्र लिहून विनंती करतात यावर चर्चा सुरु झाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या सेनेवर बोलताना एकही संधी न सोडणारे नेते ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर ते शिवसेनेचं चिन्हं गोठवताना शांत बसून होते किंवा विरोधात प्रतिक्रिया देताना दिसले होते. पण, अचानक राज ठाकरे ते शिंदे गटातील नेत्यांच्या संस्कृती विषयक भावना शेवटच्या क्षणी उफाळून आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे यांनी कृष्णकुंज बाहेर एका गाडीच्या टपावर उभं राहून म्हटलं होतं, “शिवसेनेचं नुकसान होईल किंवा ते व्हावं असा विचारही माझ्या मनात कधी येणार नाही”. मात्र त्याच बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या शिवसेनेचं चिन्ह गोठवलं गेलं तेव्हा ते मूग गिळून शांत होते, त्यात मनसेचे प्रवक्ते संध्याकाळ पर्यंत शिवसेनेवर टिपण्या आणि खिल्ली उडवण्यात व्यस्त होते आणि सगळं बोलून झाल्यावर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांनी काही बोलू नये असा ‘लेट लतीफ’ फर्मान जारी केला होता. तोच प्रकार आत्ताही घडला आहे, म्हणजे ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर ते शिवसेनेचं चिन्हं गोठवताना शांत बसलेले राज ठाकरे एकदिवस आधी शिंदेंना भेटतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आशिष शेलार याना भेटतात आणि त्यानंतर समाज माध्यमांवर पत्र जाहीर करतात. म्हणजे इथेही ‘भावनिक सहानुभूती’ शिवसेनेसोबत जाऊ नये याची काळजी घेण्यात आली आणि तोच शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरेंमधील चर्चेचा मूळ मुद्दा होता अशी माहिती समोर येतं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Andheri East By Poll Assembly Election check details 17 October 2022.

हॅशटॅग्स

#Andheri East By Poll(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x